शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
IPL 2025 Playoffs Schedule : हार्दिकला 'एक्स' भेटणार! पंजाब-बंगळुरु थेट फायनल गाठण्यासाठी भिडणार
3
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
4
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
5
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
6
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
7
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
8
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
9
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
10
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
11
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
12
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
13
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
14
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
15
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
16
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
17
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
18
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
19
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
20
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले

विद्यार्थ्यांनो, जीवनात ध्येयवादी बना

By admin | Updated: December 26, 2015 00:43 IST

जीवनात अनेक संकटे येत असतात, त्या संकटांचा धैर्याने सामना करा. बुध्दाने जीवनामध्ये असाच संघर्ष केला, कठोर तपश्चर्या करुन बुध्दत्व प्राप्त केलेत.

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : गांधी विद्यालयात वाचनालय, स्रेहसंमेलनाचे उद्घाटन भंडारा : जीवनात अनेक संकटे येत असतात, त्या संकटांचा धैर्याने सामना करा. बुध्दाने जीवनामध्ये असाच संघर्ष केला, कठोर तपश्चर्या करुन बुध्दत्व प्राप्त केलेत. यश आपोआपच मिळत नाही. त्यासाठी सतत प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. विद्यालयातील बालवैज्ञानिकांनी त्यावर सुंदर विचार मांडलेत. विद्यार्थ्यांनो ध्येयवादी बना, स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्राचा योग्य वापर करा व उच्च ध्येय गाठा, असे आवाहन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले.गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पहेला येथील स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्र, वाचनालय व शालेय स्रेहस्मेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी गांधी विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. आनंद जिभकाटे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्था उपाध्यक्ष रामदास शहारे, माजी पंचायत समिती सदस्य मोतीराम जीभकाटे संस्था विश्वस्त मंडळ उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. तसेच मान्यवरांनी कला व विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन करुन विज्ञान प्रयोगाची पाहणी केली व विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नवनविन प्रयोगाचे जिल्हाधिकारी यानी कौतुक केले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते राष्ट्रीयस्तरावर रग्बी स्पर्धेत यश मिळविणाऱ्या वर्ग १२ वी चे विद्यार्थी राहूल कामथे व विशाल नगरे यांचा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठाण भंडाराच्यावतीने मुख्याध्यापक थेरे (पहेला) व मुख्याध्यापक वैद्य (कोंढा) उपक्रमशिल मुख्याध्यापक म्हणून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अ‍ॅड. जीभकाटे यांनी, परिसराचा शैक्षणिक विकास हेच ध्येय उराशी बाळगून मी व माझे संस्थाविश्वस्त मंडळ सतत प्रयत्न करीत असतो. स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्र हा त्याच नियोजनाचा एक भाग आहे. या विद्यालयातील प्रत्येक कर्मचारी मातीशी नातं जोपासून परिसरातील विकासासाठी झपाटल्याप्रमाणे काम करीत असतो. परिसरातील आजी माजी विद्यार्थ्यांना व तरुण वर्गांनी अध्ययन केंद्राचा अभ्यासासाठी वापर करून यश गाठावे, असे प्रतिपादन केले. संचालन प्रा. व्ही. एल. हटवार व प्रा. एस. व्ही. गोंडाणे यांनी तर आभार पर्यवेक्षक एस. के. जिभकाटे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)