शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

कौशल्याभिमुख शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल

By admin | Updated: February 19, 2015 00:37 IST

एमआयईटी भंडारा येथील शैक्षणिक, तांत्रिक शिक्षण कौशल्याभिमुख आहे. एमआयईटीच्या स्थापनेच्या पाच वर्षात केलेल्या प्रगतीने या संस्थेची नजीकच्या ...

शहापूर : एमआयईटी भंडारा येथील शैक्षणिक, तांत्रिक शिक्षण कौशल्याभिमुख आहे. एमआयईटीच्या स्थापनेच्या पाच वर्षात केलेल्या प्रगतीने या संस्थेची नजीकच्या काळात राज्यातील उत्कृष्ठ तांत्रिक संस्था म्हणून निश्चितच गणना होईल, असा मला विश्वास आहे. त्या दिशेने गोंदिया शिक्षण संस्थेची वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन विधानपरिषद सदस्य राजेंद्र जैन यांनी केले.विद्यार्थ्यांच्या संशोधन व तांत्रिक गुणांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने स्थानिक मनोहरभाई पटेल इंस्टिट्युट आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी मध्ये आयोजित राष्ट्रीय स्तरावरच्या तीन दिवसीय टेक्नोसंस २०१५ स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. टेक्नोसंस २०१५ चे आ. राजेंद्र जैन यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंचावर बीएसएनलचे सहायक महाप्रबंधक अरविंद पाटील, प्राचार्य डॉ. विकास ढोमणे, एमआयईटीचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद हरडे, प्रा. कपिल कोकणे, प्रा. मोहमद नासीर, प्रा. आशिष ठाकरे, विद्यार्थी प्रतिनिधी आलोक कानेकर व अमित मलेवार उपस्थित होते. आयआयटी मुंबई, एआरके टेक्नोलॉजी सोलुशन यांच्या सहकार्याने आयोजित टेक्नोसंस २०१५ मध्ये राष्ट्रीय स्तरावरील शोधनिबंध स्पर्धा, तांत्रिक प्रकल्प सादरीकरण, रोबोरेस, रोबोसॉकर, लॅन गॅमीन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. एआरके टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने स्वनिर्मित रोबोट या सर्व स्पर्धाचे आकर्षन ठरले होते. स्पर्धेत मधुकरराव पांडव अभियांत्रिकी अ‍ॅड टेक्नॉलॉजी, मौदा, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद, शासकीय तंत्रनिकेतन साकोली, केडीके अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर व दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर येथील चमूने सहभाग घेतला.टेक्नोसंस २०१५ ची सांगता बक्षिस वितरण कार्यक्रमाचे करण्यात आली. समारोप कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून आयएएस अधिकारी राहुल द्विवेदी, एमआयईटी गोंदियाचे प्राचार्य डॉ. एस.एस. राठोड, सनफ्लॅगचे प्रबंध निदेशक प्रभाकर कोलतेवार, अशोक लेलँडचे एम.एन. लखोटे, एमआयईटीचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद हरडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. प्रल्हाद हरडे यांनी केले. एमआयईटीमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती उपस्थितांना दिली. आजच्या स्पर्धेच्या युगात समोर जाण्याकरिता आवश्यक महत्वाच्या घटकाविषयी मुख्य अतिथी राहुल द्विवेदी यांनी मार्गदर्शन केले. रोबोरेसमध्ये प्रथम आलेल्या अमिन चेटुले याचा आयआयटी मुंबई येथे होणाऱ्या अंतिम स्पर्धेकरिता निवड झाली आहे. टेक्नोसंस २०२५ च्या यशस्वी आयोजनकरिता सर्व स्पर्धा संघटकासह प्रा. कपील कोकणे, प्रा. आशिष ठाकरे, प्रा. मो. नासीर व विद्यार्थी प्रतिनिधी आलोक कानेकर व अमित मालेवार यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)