शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनो, सखोल वाचनाचे व्यसन जोपासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 00:30 IST

नवीन पिढी विभक्त कुटुंब व्यवस्थेत जीवन जगत आहे. संस्कार दुर्मिळ झाले आहेत. विद्यार्थ्यांनी पुस्तकांऐवजी मोबाईल फोन हातात घेतला आहे. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढलेली आहे.

ठळक मुद्देएकविरा माता मंदिरात कीर्तन : तुषार सूर्यवंशी यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : नवीन पिढी विभक्त कुटुंब व्यवस्थेत जीवन जगत आहे. संस्कार दुर्मिळ झाले आहेत. विद्यार्थ्यांनी पुस्तकांऐवजी मोबाईल फोन हातात घेतला आहे. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढलेली आहे. अशावेळी विद्यार्थ्यांनी फेसबुक व व्हाट्सअ‍ॅपच्या आहारी जाण्याऐवजी सखोल वाचनाचे व्यसन जोपासावे. वाचाल तर वाचाल हा शिक्षण तज्ज्ञांचा सल्ला आत्मसात करावा, असे प्रतिपादन सामाजिक कीर्तनकार तुषार सुर्यवंशी यांनी केले.एकवीरा माता मंदिर परिसरात आयोजित कीर्तन कार्यक्रमात ते बोलत होते. ग्रामगीता ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाजाला व प्रामुख्याने शेतकरी बांधवांना दिलेली मौल्यवान देणगी आहे. त्या ग्रंथात जन्मापासून मृत्यूपर्यंत करावयाच्या संस्कारांचा खजिना आहे. तो लुटण्याचा प्रयत्न करण्याऐवजी युवा पिढी भरकटत चालली आहे. त्यामुळे मूल्यशिक्षण व संस्काराला फार महत्व आलेले आहे. लोकसंख्या अफाट वाढलेली असतांना राष्ट्रसंतांना माणूस द्या मज माणूस द्या, अशी हाक द्यावी लागली. यावरून जनतेने माणूस कोण हे समजून घेण्याची गरज आहे. अंधश्रद्धा तर फोफावत चाललेली आहे. स्वत:ला सुशिक्षित समजणारा समाज बुआ-बाबांच्या मागे लागलेला आहे. दारात आलेला गरजू भिकारी उपाशी पोटी परत पाठविणारे लोक ऐतखाऊ बाबा लोकांना लाखो रुपये देणगी देतांना दिसतात यापेक्षा दुसरे दुर्दैव कोणते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. युवा पिढीतील सप्त खंजेरी वादक कीर्तनकार म्हणून तुषार सुर्यवंशी उदयास आले आहेत. कीर्तन ऐकण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.