शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
3
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
4
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
5
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
6
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
7
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
8
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
9
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
10
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
11
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
12
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
13
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
14
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!
15
DPL 2025 : "नायक नहीं खलनायक हूँ मैं..." या गोलंदाजानं हॅटट्रिक घेतली त्याच ओव्हरमध्ये मॅच घालवली
16
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
17
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
18
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
19
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
20
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू

शेतकऱ्यांची धानपीक वाचविण्यासाठी धडपड

By admin | Updated: April 11, 2016 00:27 IST

भंडारा जिल्ह्यातील चौरासचा भाग समृध्द समजला जातो. येथे पाण्याची गंगा वाहत होती. येथील शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरली आहे.

डाव्या कालव्याचे भिजत घोंगडे : पाण्याची पातळी खालावली, कृषिपंप पडू लागले बंदखेमराज डोये आसगाव(चौ.)भंडारा जिल्ह्यातील चौरासचा भाग समृध्द समजला जातो. येथे पाण्याची गंगा वाहत होती. येथील शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरली आहे. मात्र शेतीसाठी पाणी असेल तर बाणी करता येते. असी पुरातन लोकांपासूनची म्हण आहे. वैनगंगा व चुलबंद नदीच्या खोऱ्यात चौरास भाग बसला आहे. त्यातच २८ वर्षापासून गोसेखुर्द धरणाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. याला डावा आणि उजवा कालवा काढण्यात आला. धरणामुळे पाण्याचे झरे पूर्णत: बंद करण्यात आले. त्यामुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल-खोल गेली. उजवा कालव्यांतर्गत काही किमी पर्यंत रब्बीचे उत्पादन घेण्याला सुरुवात झाली. मात्र डाव्या कालव्याचे काम चुकीच्या पध्दतीने केल्याने त्यांचे भिजत घोंगडे सुरु आहे. चौरासच्या विहिरी आटल्याने कृषि पंप बंद पडू लागले. शेवटच्या टप्प्यात असलेले धानपिक सुकण्याची वेळ आली असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे सावट पसरलेले आहे.चौरासमधील आसगांव ते ढोलसर तसेच अन्य पट्यातील विहिरी आटल्याने कृषीपंप बंद पडत आहेत. आणखी पाणी लागेल या आशेने शेतकरी त्यावर काम करीत आहेत. परंतु आडात नसेल तर पोहऱ्यात कुठून येईल अशी परिस्थती शेतकऱ्यांवर ओढवली आहे. बहुतेक धान पिक लोंबीवर आलेले आहे. शेवटच्या टप्प्यात कृषिपंप बंद पडत आहेत. कुठूनतरी पाणी पिकाला देण्याचा केविलवाना प्रयत्न शेतकरी करीत आहेत. अनेक एकर शेती शेतकऱ्यांनी पाण्याअभावी सोडावी लागत आहे. शेतकऱ्यांसाठी लढा देवून त्यांना मरु देणार नाही. असे आश्वासन देणारे शासन आता तर शेतकऱ्यांच्या उरावर येवून बसल्याची प्रचिती येत आहे.राष्ट्रीय प्रकल्प गोसुखर्द धरण तत्काळ पूर्ण करुन प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्याचे आश्वासन देणारे लोकप्रतिनिधी ‘डावा कालव्याबाबद’ गप्प का बसले आहेत? असा प्रश्न शेतकरी करीत आहेत. यात शेतकऱ्यांचे काय चुकत आहे. उराशी पाणी पण पाण्याविना मरण’ असेच म्हणण्याची पाळी आली आहे.ऐवढे होऊनही बांधकामासाठी म्हणजे विकास कामासाठी वाळूची गरज असल्याचे सांगून क्षमतेपेक्षा जास्त रेती उपसा अहोरात्र सुरुच आहे. भारत हा कृषी प्रधानदेश असतांना कृषी क्षेत्राकडे दुर्लक्षच होत असल्याचे वाळू लिलावावरुन लक्षात येत आहे. माती लागेपर्यंत वाळू उपसा म्हणजे शेतकऱ्यांसाठी घातकच पर्याय ठरत आहे.शेतकरी धानपिक वाचविण्यासाठी अहोरात्र प्रयत्नकरीत आहे. विहिरी आणखी खोलवर नेवून शेवटच्या टप्प्यात असलेले धान वाचविण्यासाठी धावपड करीत आहेत. मात्र हेही प्रयत्न तोडके पडत आहेत. गोसेखुर्द धरणाचा डावा कालवा सुरु झाला तर जमिनीत पाणी झिरपूर पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. तसेच डाव्या कालवा सुरु झाल्यास शेतकरी रब्बी धान पिकाला पाणी देण्याचा प्रयत्न करु शकतात. मात्र कंत्राटदारांकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करुन आपली पोळी शेकण्याचा प्रयत्न केल्याने एकदा तयार झालेला डावा कालवा पुर्णत: उधळावा. आता दुसऱ्यांदा त्याच्या बांधकामाची प्रतिक्षा सुरु आहे. हाच धरण व कालवा शेतकऱ्यांसाठी मरणाचा प्रश्न ठरला आहे.शासन कागदावर योजना राबवितो मात्र त्याची अंमलबजावणी योग्य पध्दतीने होत नसल्याने शेवटचा नागरिक म्हणजेच खेड्यातील शेतकऱ्याला त्या योजनेचा लाभ मिळत नाही. त्याचेच एक उदाहरण म्हणजे गोसेखुर्द धरण म्हणावे लागेल. धान पिकाच्या शेतीला भेगा पडल्याने शेवटच्या टप्प्यात शेतकऱ्यांनी धान पिकांची आशा सोडावी लागत असल्याने पुन्हा शेतकरी कर्जाच्या खायीत लोटला जाईल.मात्र आणेवारीच्या चुकीच्या पध्दतीने जिल्ह्यातील चार तालुका वगळल्याने शेतकऱ्यांना शासनाप्रती तीव्र रोष उत्पन्नहोत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला वाचविण्यासाठी डावा कालवा तात्काळ सुरु करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.