शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भिक लागली काय, मी तुला फुकट पोसणार काय ? शशांकने मागितले होते 2 कोटी 
2
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
3
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
4
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
5
"१५ हजारांचा चाजनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
6
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
7
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
8
पावलं मंदावलीत पण उत्साह कायम! वयाची ऐंशी ओलांडलेल्या बहिणींना जग फिरण्याची भारीच हौस
9
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
10
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
11
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या
12
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
13
वैष्णवी हगवणे यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती, आहे असा उल्लेख
14
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा
15
Corona Virus : कोरोनाचा भयावह वेग! ब्रिटनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या एका आठवड्यात झाली दुप्पट
16
तीन दिवसांच्या घसरणीला 'ब्रेक'! सेन्सेक्स-निफ्टी उसळले, 'या' शेअर्सनी दिला बंपर फायदा!
17
IPL 2025: वैभव सूर्यवंशी अन् त्याला आलेले ५०० 'मिस्ड कॉल'; राहुल द्रविडसमोर झाली 'पोलखोल'
18
Luck Sign: देवपूजा करताना 'या' गोष्टींचे घडणे, म्हणजे साक्षात ईश्वरीकृपेचे शुभसंकेत!
19
Nala Sopara: नालासोपाऱ्यात अडीच कोटींचे अंमली पदार्थ जप्त, नायजेरियन आरोपीला अटक
20
CPEC चा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत होणार, पाकिस्तानच्या सहकार्याने चीनचा नवी खेळी

रोंघा गावाची ‘मन की बात’ मध्ये येण्यासाठी धडपड

By admin | Updated: December 22, 2015 00:38 IST

आमदार आदर्श गाव योजनेत तुमसर तालुक्यातील आदिवासीबहुल रोंघा या गावाची निवड नागपूर विभागीय पदवीधर मतदार संघातील आमदार अनिल सोले यांनी केली आहे.

आमदार आदर्श योजना : अनिल सोले यांनी घेतले रोंघा दत्तक मोहन भोयर  तुमसरआमदार आदर्श गाव योजनेत तुमसर तालुक्यातील आदिवासीबहुल रोंघा या गावाची निवड नागपूर विभागीय पदवीधर मतदार संघातील आमदार अनिल सोले यांनी केली आहे. भंडारा जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असून नागपूर जिल्ह्याच्या सीमा जुळून आहेत. प्रधानमंत्र्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात हे गाव येण्याकरिता धडपड सुरू आहे.खासदार व आमदारांनी आदर्श गाव संकल्पना राबवून गावांचा विकास करावा, अशी घोषणा करण्यात आली होती. अविकसीत गावाचा कायापालट व्हावा हा उदात्त हेतू या योजनेचा आहे. तुमसर तालुक्यातील आदिवासीबहुल रोंघा या गावाची निवड नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाचे आमदार प्रा.अनिल सोले यांनी केली. तुमसर शहरापासून हे गाव ३५ कि.मी. अंतरावर आहे. हे गाव भंडारा जिल्ह्याचे शेवटचे टोक आहे. सातपुडा पर्वत रांगात जंगलव्याप्त परिसरातील रोंघा या गावाची आ.सोले यांनी निवड केली. विकासापासून दूर अशी या गावाची ओळख आहे. हे गाव विकसित करण्याचा निर्धार आ.सोले यांनी केला आहे.या गावाची लोकसंख्या १,८२६ इतकी असून भूमिहिन, शेतमजुरांची संख्या सर्वाधिक आहे. ग्रामपंचायत असून जिल्हा परिषदेची १ ते ७ ची शाळा गावात आहे. दहावीपर्यंत खासगी शाळा आहे. या गावाला आ.सोले यांनी २५ लाखांचा निधी दिला. आत्माअंतर्गत शेतकऱ्यांचा गट तयार करण्यात आला. गावात समाधान शिबिर घेण्यात आले. यात संपूर्ण गावाचे नियोजन करण्यात आले. यावेळी आ.अनिल सोले, आ.चरण वाघमारे उपस्थित होते.गावाचा समतोल विकास साधणे, विकास कामे करणे व स्वत:च्या पायावर ग्रामस्थांना कसे उभे राहता येईल याकरिता गाव विकसीत करण्याचा संकल्प आहे. कामे करीत राहा हाच एकमेव हेतू आहे.- प्रा. अनिल सोले,सदस्य, पदवीधर मतदारसंघ नागपूर विभाग.