शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रोखण्यासाठी कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 05:00 IST

गांधी चौक, राजीव गांधी चौक, त्रिमूर्ती चौक, खात रोड, लाल बहादूर शास्त्री चौक, बसस्थानक परिसर, मोठा बाजार यासह शहरातील सर्व भागातील दुकाने बंद होती. मात्र असे असले तरी अनेक जण विनाकारण रस्त्यावर भटकंती करीत असल्याचे दिसत होते. शहरालगतच्या गणेशपूर परिसरात हा बंद नव्हता त्यामुळे अनेक जण गणेशपूर येथे जाऊन चहा-खर्राची व्यवस्था करताना दिसत होते. एकीकडे व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी योगदान दिले.

ठळक मुद्देचार दुकानांवर कारवाई : भंडारा नगर परिषदेच्या आवाहनाला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या असून दर मंगळवारी सर्व आस्थापना आणि दुकाने बंद ठेवण्याचे आदेश नगर परिषदेने दिले होते. या आदेशानुसार पहिल्या मंगळवारी शहरात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. औषधीची दुकाने वगळता सर्व आस्थापना बंद होत्या. बंद काळात उघडे ठेवणाऱ्या चार दुकानांवर नगर परिषदेच्या पथकाने कारवाई केली. शहरातील सर्व दुकाने बंद असली तरी नागरिक मात्र विनाकारण रस्त्यावर भटकंती करीत असल्याचे चित्र दिवसभर होते.भंडारा शहरात गत काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. नागरिकांना वारंवार सूचना देऊनही गर्दी करीत आहे. यासाठी नगर परिषदेने १९ मार्च रोजी एक आदेश निर्गमित करून सर्व दुकानांची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ७ केली आहे. यासोबतच दर मंगळवारी सर्व आस्थापना आणि दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार पहिल्या मंगळवारी शहरातील दुकानदारांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. शहरातील प्रत्येक भागातील दुकाने बंद होती. सर्व सामसूम दिसत होते. गांधी चौक, राजीव गांधी चौक, त्रिमूर्ती चौक, खात रोड, लाल बहादूर शास्त्री चौक, बसस्थानक परिसर, मोठा बाजार यासह शहरातील सर्व भागातील दुकाने बंद होती. मात्र असे असले तरी अनेक जण विनाकारण रस्त्यावर भटकंती करीत असल्याचे दिसत होते. शहरालगतच्या गणेशपूर परिसरात हा बंद नव्हता त्यामुळे अनेक जण गणेशपूर येथे जाऊन चहा-खर्राची व्यवस्था करताना दिसत होते. एकीकडे व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी योगदान दिले. मात्र काही जण रस्त्यावर भटकून त्याला तडा देताना दिसत होते. शहरातील चार दुकानांवर नगर परिषदेच्या पथकाने कारवाई करून प्रत्येकी दीड हजार रुपये दंड वसूल केला. या दुकानदारांना नगरपरिषदेने समज दिली. शहरात सकाळपासूनच बंदची चर्चा होती. नागरिकांनीही याला सहकार्य केले. त्यामुळे मंगळवारी बंद यशस्वी झाला.

शहरात सात ठिकाणी चेकपोस्ट  विनाकारण रस्त्यावर भटकंती करणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी शहरातील मुख्य सात चौकात नगर परिषद चेकपोस्ट उभारणार आहे. त्या ठिकाणी शहरात फिरणाऱ्यांना जाब विचारला जाणार आहे. शहरातील त्रिमूर्ती चौक, जिल्हा परिषद चौक, राजीव गांधी चौक, खांबतलाव चौक, गांधी चौक आणि शास्त्री चौकात चेकपोस्ट उभारले जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी दिली. तसेच शहरातील सर्व आस्थापनामधील कर्मचाऱ्यांची शंभर टक्के कोरोना टेस्ट करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नगर परिषदेच्या तीन कर्मचाऱ्यांना दंड  विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मंगळवारी नगर परिषदेच्या कार्यालयातच तीन कर्मचारी विना मास्क असल्याचे दिसून आले. तिघांना प्रत्येकी १५० रुपये दंड आणि कारणे दाखवा नोटीस बजावली.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी नगर परिषदेला सहकार्य करावे, विनाकारण कुणीही रस्त्यावर भटकंती करू नये, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांच्या सहकार्यानेच भंडारा शहर कोरोनामुक्त होणार आहे.-विनोद जाधव,                  मुख्याधिकारी नगर परिषद, भंडारा.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या