शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

आरोपींना कठोर शिक्षा द्या

By admin | Updated: August 8, 2015 00:38 IST

प्रीती पटेल हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, आरोपींचा बचाव करणाऱ्या पोलिसांविरुद्ध कारवाई करण्यात यावी,...

जिल्हा कचेरीवर धडकला सर्वपक्षियांचा मोर्चाशहरातील अवैध धंदे बंद करण्याच्या दिल्या घोषणा भंडारा : प्रीती पटेल हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, आरोपींचा बचाव करणाऱ्या पोलिसांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, प्रकरण राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात यावे, अश्विनी शिंदे व भव्य पटेल यांच्या उपचाराचा खर्च शासनाने द्यावा, यासह भंडारा शहरातील अवैध व्यवसाय, गांजा, ड्रग्स विक्री करणाऱ्यांना अटक करण्यात यावी या मागणींसाठी भंडारा शहरात शुक्रवारला सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.शुक्र वारी सकाळी ११ वाजता हा मोर्चा म्हाडा कॉलनीतून काढण्यात आला. शहरातील मुख्य मार्गाने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर त्रिमूर्ती चौकात झालेल्या निषेध सभेत भाजपचे आमदार चरण वाघमारे, शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, राकाँचे धनंजय दलाल, नगराध्यक्ष बाबुराव बागडे, नगरसेवक महेंद्र गडकरी, परमानंद मेश्राम, प्रशांत लांजेवार, आबिद सिद्धीकी यांनी या घटनेचा निषेध नोंदविला. यावेळी आ.वाघमारे म्हणाले, सरकार कुणाचेही असो, जिल्ह्यातील अवैध धंदे बंद झाले नाही तर विरोध करण्यासाठी पुढे राहीन, असे सांगून आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी धीरजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्याशी चर्चा करताना शहरातील गुन्हेगारी, अंमली पदार्थांची विक्री व व्यवसायाला पोलिसांची असलेली मूकसंमती या बाबी त्यांच्या लक्षात आणून दिल्या. यावेळी परिषद कक्षात अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, अवैध धंद्यांविरोधात प्रशासन कठोर कारवाई करीत आहे. अप्पर पोलीस अधीक्षक बारवकर म्हणाले, अंमली पदार्थ विक्रीविरुद्ध मोहीम सुरू केली असून लवकरच शहर अंमली पदार्थ मुक्त होईल. नागरिकांना अवैध धंद्यांबाबत माहिती मिळाल्यास त्यांनीसुद्धा पोलिसांना माहिती द्यावी. जेणेकरून कारवाई तत्काळ होऊ शकेल, असे सांगितले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिल्लारी उपस्थित होते.दि. ३० जुलै रोजी म्हाडा कॉलनी व समृद्धीनगरात आमिर शेख व सचिन राऊत या दोघांनी दरोडा टाकून प्रिती पटेल या महिलेचा निर्घृण खून केला. अश्विनी शिंदे व भव्य पटेल यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याने ते गंभीररित्या जखमी झाले. आरोपींनी अंमली पदार्थाच्या नशेत हे हत्याकांड घडवून आणल्याचे तपासात उघडकीस आल्यामुळे अंमली पदार्थाविरुद्ध शहरात संतापाची लाट उसळली आहे. हे अंमली पदार्थ कुठून येतात, याचे हस्तक कोण? याची माहिती पोलिसांना असूनही ते यावर कारवाई करीत नाही. सदर हत्याकांड घडल्यानंतर अंमली पदार्थ विक्रीविरुद्ध शहरात पोलीस प्रशासाविरुद्ध संताप आहे. त्यामुळे सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलीस विभागाविरुद्ध शुक्रवारला निषेध मोर्चा काढून रोष व्यक्त केला. या मोर्चात नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. या आंदोलनात होमगार्डचे जिल्हा समादेशक डॉ.श्रीकांत वैरागडे, जिल्हा परिषद सदस्य प्यारेलाल वाघमारे, प्रेम वनवे, नगरसेवक अ‍ॅड.विनयमोहन पशिने, मंगेश वंजारी, किरीट पटेल, नगरसेवक सूर्यकांत इलमे, विकास मदनकर, किरण व्यवहारे, सुनील रंभाड, प्रवीण उदापुरे, अ‍ॅड. प्रभात मिश्रा, नितीन सोनी, अमृत पटेल, धीरज पटेल, संजय मते, विक्की सार्वे, नितीन सोनी, रवि नशिने, प्रदीप देशमुख, अजय तांबे आदींसह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.(जिल्हा प्रतिनिधी)