शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 01:19 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख १० मे असून उमेदवारी अर्ज दाखल झालेल्या दिवसांपासून उमेदवारांसाठी असलेल्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यु काळे यांनी दिले आहे.

ठळक मुद्देअभिमन्यु काळे : रोकड व दारु वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख १० मे असून उमेदवारी अर्ज दाखल झालेल्या दिवसांपासून उमेदवारांसाठी असलेल्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यु काळे यांनी दिले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात पोटनिवडणुकीसंबंधी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी काळे यांनी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात रोकड वाहतूक व दारूच्या वाहतुकीवर कडक निर्बंध घालण्याच्या सूचना पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आले आहे. दोन्ही जिल्ह्यात असलेल्या मतदान केंद्रांचा आढावा घेऊन केंद्र निश्चित करण्यात यावे. यात संवेदनशिल, अतिसंवेदनशिल मतदान केंद्राची निश्चिती करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिले आहेत. प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी स्ट्राँग रूम तयार करण्यात यावी. स्टॅटिक्स सर्व्हेलन्स चमू व व्हिडिओ पथक नेमन्यात यावे. निवडणुकीच्या निमित्ताने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सभा होत असतात. ही बाब लक्षात घेऊन परवानगीसाठी एक खिडकी योजना राबवावी.सभेची परवानगी देताना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य हे धोरण राबविण्यात यावे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलीकॉप्टरची परवानगी आवश्यक असल्यास त्या अनुषंगाने परवानगी द्यावी, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय विना परवानगी कोणतीही सभा किंवा रॅली निघणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. निवडणूक प्रचारासाठी विविध पक्ष पॉम्पलेट व हॅण्डबील प्रकाशित करतात, त्यावर मुद्रक प्रकाशकाचे नाव असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.अधिकारी व कर्मचाºयांच्या प्रशिक्षणाच्या तारखा निश्चित करून त्यांचे तात्काळ प्रशिक्षण घ्यावे. यामध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचे प्रशिक्षण योग्य प्रकारे देण्याच्या सूचनाही केल्या. निवडणूक निरिक्षक १० मे रोजी येणार असून मतदान केंद्रांना भेटी देणार आहेत. मतदान केंद्रावर आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात. आचारसंहिता भंग झाल्यास संबंधित पोलीस ठाण्यात तातडीने गुन्हा दाखल करावा. आचारसंहितेच्या गुन्ह्यासाठी पोलीस विभागाने स्वतंत्र नोंदवही ठेवावी, अशा सूचना या बैठकीत करण्यात आले. पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयाने काम करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीनंतर जिल्हाधिकारी अभिमन्यु काळे यांनी मतमोजणीसाठी समाजिक न्याय भवनाची पाहणी केली. बैठकीला भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू, गोंदियाचे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप भुजबळ, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपजिल्हाधिकारी निवडणूक विलास ठाकरे, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी व तहसिलदार उपस्थित होते.