शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

धम्मक्रांती जपून धम्माचा पाया मजबूत करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2017 00:21 IST

क्रांती आपोआप होत नाही. ती विचार, संघर्ष व आचरणाने होते. बोधिसत्त्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वाचन, मनन व चिंतन करून आचरणातून धम्मक्रांती घडवून आणली आहे.

अमृत बन्सोड यांचे प्रतिपादन : बौद्ध पर्यटन स्थळ दशबल टेकडी हत्तीडोई येथील धम्म मेळावा जवाहरनगर : क्रांती आपोआप होत नाही. ती विचार, संघर्ष व आचरणाने होते. बोधिसत्त्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वाचन, मनन व चिंतन करून आचरणातून धम्मक्रांती घडवून आणली आहे. तिचे मोल जपून आपण सर्वांनी धम्माचा पाया मजबूत करावा, असे प्रतिपादन साहित्यिक अमृत बन्सोड यांनी केले. बौद्ध पर्यटनस्थळ दशबल पहाडी हत्तीडोई सीतेपार येथे दशबल पहाडी भिक्खू संघ, सीतेपारद्वारा आयोजित माघ पौर्णिमा वर्धापन दिनानिमित्त आयोजित बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना व धम्म मेळाव्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डी.एफ. कोचे हे होते. मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा.अनिल कान्हेकर, अ‍ॅड.अमरदीप चवरे, प्रिया शहारे, टी.यु. गेडाम, अचल मेश्राम, मदनपाल गोस्वामी, मंगेश हुमणे, सिद्धार्थ गजभिये, आहुजा डोंगरे, संजय बन्सोड, अरुण अंबादे, गजानन पडोळे, सरपंच सुरेश शेंदरे, भीमराव लाडे उपस्थित होते. प्रेमसागर गणवीर म्हणाले, बौद्ध संस्कृतीच्या पाऊलखुणा उमटलेल्या या दशबल पहाडी पर्यटनस्थळाच्या विकासाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. याकरिता प्रशासनाने लक्ष देऊन या स्थळाचा विकास करावा. डी.एफ. कोचे म्हणाले, बौद्ध धम्म ही व्यक्तीची व मानवी मुक्तीची आचारसंहिता आहे. धम्म हा दैनंदिन जीवन जगण्याचा उत्तम मार्ग आहे. माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी म्हणाले, धर्मामध्ये ईश्वराला जे स्थान आहे तेच स्थान बौद्ध धम्मात नीतीला आहे. नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीती, हे आपण समजून घेतले पाहिजे. तत्पूर्वी सकाळी त्रिरत्न वंदना व धम्मध्वजारोहण धम्मज्योती यांच्या हस्ते करण्यात आले. समता सैनिक दलाचे गजेंद्र गजभिये यांच्या संचालनात शहापूर येथून दशबल पहाडीपर्यंत धम्मरॅली काढण्यात आली. तद्नंतर दशबल पहाडी येथील विहारात भिक्खूनी संघप्रिया, भिक्खू वकुली, भदन्त मिलिंद, भदन्त डॉ.धम्मदीप, भदंत रत्नाकर, भदन्त रत्नधातू, भदन्त धम्मज्योती, भिक्खुणी विशाखा, भिक्खुणी शीलाचारा यांची उपस्थिती होती. बुद्धवंदना, बुद्धपूजा व महामंगल सुत्त पठनाने श्रीलंकेहून आणलेल्या बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानंतर लगेच धम्मदेशनेच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यात भदन्त डॉ.धम्मदीप, भदन्त धम्मज्योती, भदन्त वक्कली, भिक्खुणी संघप्रिया यांनी उपासक उपासिकांना धम्मदेशना दिली. त्यानंतर महेंद्र गडकरी, प्रेमसागर गणवीर, अमृत बन्सोड, डी.एल. कोचे, मदनपाल गोस्वामी यांच्या हस्ते बुद्ध मूर्तीचे अनावरण करण्यात आले. रात्री समाजप्रबोधनकार भगवान गावंडे यांचा जाहीर गायनाचा कार्यक्रम झाला.संचालन महेंद्र वाहणे यांनी केले. उपस्थितांचे आभार ट्रस्टचे संस्थापक सचिव संघप्रिया यांनी मानले. यशस्वितेसाठी देवानंद नंदागवळी, जितेंद्र खोब्रागडे, मनोज घरडे, मोरेश्वर गजभिये, प्रदीप नारनवरे, मनोज चवरे, उमेश गजभिये यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)