शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेची चळवळ बळकट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 23:09 IST

नागरिकांना स्वच्छतेची सवय लागावी व आरोग्यदायी जीवन जगता यावे, यासाठी स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात स्वच्छता ही सेवा.....

ठळक मुद्देमनोजकुमार सूर्यवंशी : स्वच्छता ही सेवा चित्ररथाला हिरवी झेंडी, गावागावात होणार जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नागरिकांना स्वच्छतेची सवय लागावी व आरोग्यदायी जीवन जगता यावे, यासाठी स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात स्वच्छता ही सेवा अभियानास १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोंबर या दरम्यान जिल्हाभर राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांनी स्वच्छतेची चळवळ बळकट करुन स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन मुख्य कार्यपालन अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी केले.स्वच्छता ही सेवा या अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यात चित्ररथाद्वारे जनजागृती केली जाणार आहे. या चित्ररथाला मुख्य कार्यपालन अधिकारी सुर्यवंशी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) मंजुषा ठवकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) सुधाकर आडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता) चंद्रशेखर पुद्दटवार, मुख्य वित्त व लेखा अधिकारी अशोक मातकर, समाज कल्याण अधिकारी विजय झिंगरे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) मोहन चोले, कार्यकारी अभियंता ए. पी मुखरे, एम.बी.मैद्दमवार, आरोग्य विभागाचे भगवान मस्के, गट विकास अधिकारी डी. एम. देवरे, एस.एम. तडस, के. एल. मोरे, कृषी विकास अधिकारी पाटील, जिल्हा पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. एन.एच. फुके, मिडीया सोल्युशनचे उमेश महतो व कार्यक्रम व्यवस्थापक डी.एच. बिसेन यावेळी उपस्थित होते.जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या चित्ररथ व एलईडी व्हॅनला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. गावागावात स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी हा चित्ररथ फिरणार आहे. शौचालय व स्वच्छतेचे महत्व सांगणारे लघुपट चित्ररथावर गावकºयांना दाखविल्या जाणार आहे.१५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाºया स्वच्छता ही सेवा अभियान दरम्यान जिल्ह्यात स्वच्छतेची जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहे.नादुरुस्त शौचालय व शौचालय असलेल्या कुटुंबाना गृहभेटी करुन स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करणे, सक्रीय लोकसहभाग मिळविण्यासाठी महिला बचत गटांच्या सभा, शालेयस्तरावर मार्गदर्शन सभा, किशोरवयीन मुलींना स्वच्छतेविषयी मार्गदर्शन व ज्येष्ठ नागरिकांची सभा घेवून मार्गदर्शन केल्या जाणार आहे. लोकसहभागातून श्रमदान करुन गाव परिसर स्वच्छता, महापुरुषांचे पुतळे, स्मारके स्वच्छ करणे, परिसर स्वच्छता करण्यात येत असल्याचे सुर्यवंशी यांनी सांगितले. लोकसहभागाशिवाय स्वच्छता ही चळवळ होणार नाही, असे सांगून सुर्यवंशी म्हणाले की, स्वच्छतेची सवय स्वत:हून लावून घ्यावी, असे प्रतिपादन सुर्यवंशी यांनी यावेळी केले.