शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

समाज घडविण्याची ताकद युवा पिढीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 22:34 IST

समाज घडविण्याची ताकद युवा पिढीमध्ये आहे. युवकांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी सकारात्मक विचाराला चालना दिली पाहिजे व आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर केला पाहिजे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : जिल्हास्तरीय युवा संमेलन

आॅनलाईन लोकमतभंडारा : समाज घडविण्याची ताकद युवा पिढीमध्ये आहे. युवकांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी सकारात्मक विचाराला चालना दिली पाहिजे व आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर केला पाहिजे. युवकांनी मोठी स्वप्न बघावी व त्याच्या पूर्ततेसाठी कठोर परिश्रम व सातत्य ठेवावे. तरुणांनी कुठलीही गोष्ट स्विकारण्यापूर्वी त्यांचे शास्त्रीय विश्लेषण केले पाहिजे. युवा पिढीमध्ये जाज्वल देशाभिमान असला पाहिजे तरच ते जबाबदार नागरिक बनु शकतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले.भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयांतर्गत येणाऱ्या नेहरु युवा केंद्र भंडारातर्फे राष्ट्रीय सेवा योजना व जे.एम. पटेल महाविद्यालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवा संमेलनाचे आयोजन जे.एम. पटेल सभागृहात करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जे.एम. पटेल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. कार्तीक पाणीकर होते तर विशेष अतिथी म्हणून नागपूर विद्यापिठ सिनेट सदस्य प्रविण उदापूरे, स्पर्धात्मक परिक्षेचे मार्गदर्शक प्रा. अनिल महल्ले, नेहरु युवा केंद्र भंडाराचे जिल्हा युवा समन्वयक संजय माटे व राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. राजेंद्र शाह उपस्थित होते.यावेळी नागपूर विद्यापिठ सिनेट सदस्य प्रविण उदापूरे यांनी विद्यार्थी युवकांच्या समस्या व त्या निवारण्याचे उपाय उपस्थित युवक युवतींसमोर मांडले. स्पर्धात्मक परिक्षेचे मार्गदर्शक प्रा. अनिल महल्ले युवकांना मार्गदर्शन करतांना म्हणाले, नोकरी मिळविण्यासाठी युवकांनी आपल्यातील कौशल्य विकसित केले पाहिजे. आपला आत्मविश्वास वृध्दिंगत करुन आपले व्यक्तिमत्व घडविले पाहिजे.प्रास्ताविकात कार्यक्रमाची भूमिका माडतांना संजय माटे म्हणाले की, युवकांच्या विकासाला गती देण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी व त्यांना राष्ट्रविकासाच्या मुख्य धारा प्रवाहात जोडण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन आहे. या वर्षीचा उत्कृष्ट जिल्हा युवा मंडळ पुरस्कार जाहिर करण्यात आले असून हा पुरस्कार भंडारा डिस्ट्रिक्ट स्पोर्टस आश ते डु असोशिएशन पवनी यांना मिळाला. पुरस्काराचे स्वरुप २५ हजार रुपये रोख व जिल्हाधिकारी यांच्या सहीनिशी प्रमाणपत्र असे आहे. हा पुरस्कार जिल्हाधिकारी यांच्या हस्ते देण्यात आला.संचालन गणेश खडसे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. राजेंद्र शाह यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेहरु युवा केंद्राचे रमेश अहिरकर, राष्ट्रीय युवा स्वयंसेवक रिना फुले, आकाश थानथराटे, शालु पिलारे, प्रिया रंगारी, सुर्यकांत मरघडे, शुभम मारबते यांनी सहकार्य केले.