शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

केशोरी येथील पथदिवे महिनाभरापासून बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:37 IST

केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी येथील सार्वजनिक विद्युत पथदिवे गेल्या एक महिन्यापासून बंद आहेत. परिणामी, गावकऱ्यांना रात्रीच्या वेळेस अंधाराचा ...

केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी येथील सार्वजनिक विद्युत पथदिवे गेल्या एक महिन्यापासून बंद आहेत. परिणामी, गावकऱ्यांना रात्रीच्या वेळेस अंधाराचा सामना करावा लागत आहे. पथदिवे केव्हा सुरू होणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सार्वजनिक विद्युत पथदिव्यांचे विद्युत बिल थकीत असल्याने विद्युत वितरण कंपनीने सार्वजनिक पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. तेव्हापासून केशोरी गावात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गावातील सार्वजनिक विद्युत पथदिव्यांची फक्त देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीची असून, विद्युत बिल भरण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे.

जिल्हा परिषदेने सार्वजनिक विद्युत पथदिव्यांचे थकीत बिल भरण्याचे नाकारून आपली जबाबदारी झटकली आहे. विद्युत वितरण कंपनीने थकीत असलेल्या बिलाची मागणी करून, पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. तेव्हापासून केशोरी येथील सार्वजनिक पथदिवे बंद आहेत. शासनाने आदेश काढून ग्रामपंचायतीने पंधराव्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीतून थकीत विद्युत पथदिव्यांच्या बिल भरण्याबाबत सूचना केल्या आहेत, परंतु येथील ग्रामपंचायतीने पंधराव्या वित्त आयोगाची प्राप्त निधी गाव विकासाच्या बाबीवर खर्च करण्याचे नियोजन करून विनियोग केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीकडे स्वनिधी उपलब्ध नाही. सार्वजनिक विद्युत पथदिव्यांचा थकीत विद्युत बिल भरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शासनाने तो आदेश त्वरित मागे घ्यावा

nगाव विकासासाठी खर्च होणारा निधी सार्वजनिक पथदिव्यांचा थकीत विद्युत बिल भरण्यासंदर्भातील शासनाने आदेश काढून क्लिष्टता निर्माण केल्याचा आरोप तालुका सरपंच संघटनेचे प्रमुख नंदू पाटील गहाणे यांनी केला आहे. पथदिव्यांच्या थकीत विद्युत बिल भरण्यासाठी ग्रामपंचायतीने दिरंगाई केल्यास सरपंच व ग्रामसेवक यांना वैयक्तिकरीत्या जबाबदार धरून अन्याय केला आहे. या प्रकारामुळे ग्रामसेवक व सरपंच यांच्या डोक्यावरील ताण वाढला आहे. शासनाने काढलेला आदेश त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे.