शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाने धानपिकाची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 21:26 IST

दोन दिवसांपासून जिल्ह्यातील मोहाडी तालुका वगळता परतीच्या पावसाने चांगली हजेरी लावली. यात धानपिकाची नासाडी झाली आहे.

ठळक मुद्देकडपाही भिजल्या : किडीचा प्रादुर्भाव वाढला, मोहाडी तालुक्यात पावसाची पिछेहाट, आतापर्यंत फक्त ६५ टक्के पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दोन दिवसांपासून जिल्ह्यातील मोहाडी तालुका वगळता परतीच्या पावसाने चांगली हजेरी लावली. यात धानपिकाची नासाडी झाली आहे. धान गर्भार अवस्थेत असल्याने पाण्याची गरज होती, हे सत्य असले तरी तरी वादळी वारा व पावसाच्या तडाख्याने काही ठकाणी धानपिक जमीनदोस्त झाल्याने पुन्हा बळीराजाची चिंता वाढली आहे.भंडारा शहरातही दुपारच्या सुमारास हजेरी लावली. ऊन व सावलीच्या खेळात मात्र आजारालाही खत मिळत आहे. तालुक्यात १४.८ मि.मी पाऊस बरसल्याची नोंद करण्यात आली.लाखनी/पालांदूर : तालुक्यातील पालांदूर परीसरात विजांच्या कडकडाटांसह पावसाने दमदार हजेरी लावल्याने धानपिकाचे नुकसान झाले. धान भुईसपाट झाले. यात शेतकºयाचे सुमार नुकसान झाले. पावसापासून पीक वाचविण्याकरिता शेतकºयांचा केविलवाणा प्रयत्न सुरू झाला आहे. धानपीक मातीमोल होत असल्याचे पाहून बळीराजाचा जीव कासावीस झाला आहे. अनेक अडचणींचा सामना करीत ९८ टक्के रोवणी कशीबशी पार पाडीत गणेशचतुर्थीचा मुहूर्त लागला. धान फुटण्यावर येत नाही तर पुन्हा पावसाने दीेर्घ विश्रांती घेतली. याच काळात खोडकिडी, करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला. खर्च वाढतच आहे. नदीनाल्या काठावरील पिके अधिकच प्रभावीत झाली आहे. नरादा, मºहेगाव, पाथरी, वाकल आदी गावातील धान कापणी योग्य झाली असून काही ठिकाणी कडपा ओल्या आहेत.साकोली : तालुक्यात काही ठिकाणी पासवाने हजेरी लावली. पहाटेच्या सुमारास पाऊस बरसला. मात्र त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण होते. यामुळे अशा वातावरणामुळे धानावर रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे.मोहाडी : तालुक्यातील शेतकºयांना सिंचनासाठी पाण्ळाची गरज असताना परतीच्या पावसाने काी प्रमाणात हुलकावणी दिली आहे. धान गर्भार अवस्थेत असल्याने एका पाण्याची गरज आहे. ढग जमले पण बसरले नाही, अशी स्थिती पाहायला मिळालीतुमसर : शहरात परतीच्या पावसाने हजेरी लावली मात्र तालुक्यात सर्वदूर पाऊस बरसला नाही. मागील २४ तासात १.२ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली.पवनी : तालुक्यातील चौरास भागात पावसाने वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावल्याने धानपिकांचे नुकसान झाले आहे. रविवारी सकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली त्यानंतर सायंकाळपर्यत पाऊस बरसला नाही. झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी होत आहे.आसगाव चौ. : वादळी पावसाने बहुतांशी धान पिक भुईसपाट झाल्याने पिक मातीमोल होण्याची दाट शक्यता आहे. त्यातच नेहमीप्रमाणे यंदाही असमतोल वातावरणामुळे धानावर किड तुडतुड्याने आक्रमण केल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे. धान पिक जमीनीवर लोटल्याने उत्पादनावर ५० टक्के नुकसान होणार असल्याचे शेतकºयांचे मत आहे. असाच वातावरण जर आठवड्याभर राहिल्यास व त्यातच आणखी पावसाने हजेरी लावल्यास अपेक्षेपेक्षा जास्तच उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.