शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या दिवशी खरेदीसाठी तुफान गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 21:22 IST

भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडाला होता. मात्र, आता कोरोना संसर्ग कमी होऊ लागला. जिल्ह्यात कोरोना पाॅझिटिव्हिटी दर ७.७ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ‘ब्रेक दी चेन’मध्ये अंशत: सवलत दिली. जिल्ह्यातील अत्यावश्यक आणि इतर दुकानांना सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत उघडे ठेवण्याची परवानगी दिली. मंगळवारी पहिल्या दिवशी सकाळी ७ वाजेपासूनच नागरिक रस्त्यावर दिसत होते.

ठळक मुद्देनागरिक दिवसभर रस्त्यावर : सकाळी ८ वाजेपासूनच विविध दुकानांमध्ये ग्राहक

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत दीड महिन्यापासून बंद असलेली बाजारपेठ मंगळवारी सकाळी ७ वाजता उघडली आणि ग्राहकांची एकच गर्दी झाली. शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर वाहनांची, तर दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसत होती. कोरोना संसर्ग कमी झाल्याने नागरिक दिवसभर रस्त्यांवर गर्दी करून असल्याचे चित्र मंगळवारी शहरात होते.भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडाला होता. मात्र, आता कोरोना संसर्ग कमी होऊ लागला. जिल्ह्यात कोरोना पाॅझिटिव्हिटी दर ७.७ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ‘ब्रेक दी चेन’मध्ये अंशत: सवलत दिली. जिल्ह्यातील अत्यावश्यक आणि इतर दुकानांना सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत उघडे ठेवण्याची परवानगी दिली. मंगळवारी पहिल्या दिवशी सकाळी ७ वाजेपासूनच नागरिक रस्त्यावर दिसत होते. दीड महिन्यानंतर दुकान उघडण्यासाठी व्यापारीही उत्सुक झाले होते. सकाळी ९ वाजेनंतर ग्राहकांची मोठी गर्दी दुकानांमध्ये दिसून आली. कापड, स्टेशनरी, जनरल स्टोअर्स यासह विविध दुकानांमध्ये ग्राहक दिसत होते. कापड दुकानात तर सकाळी ८ वाजेपासूनच ग्राहकांची गर्दी झाली होती. भंडारा शहरातील मेन लाइन, मोठा बाजार परिसरात दुकाने उघडल्याने उत्साहाचे वातावरण दिसत होते. ग्राहक मोठ्या संख्येने खरेदी करीत होते. आतापर्यंत ओस पडलेल्या रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी दिसून आली. खरेदीचा उत्साह एवढा मोठा होता की, कुणालाही कोरोना संसर्गाच्या नियमांचे पालन करण्याचे भान दिसले नाही. मास्क लावलेला असला तरी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचे सर्वत्र चित्र होते.व्यापाऱ्यांमध्ये उत्साह- कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत दीड महिन्यापासून बंद असलेली दुकाने उघडण्यासाठी व्यापाऱ्यांमध्येही उत्साह दिसून येत होता. कापड, सराफा, भांडी, जनरल स्टोअर्स यासह विविध दुकाने सकाळी ७ वाजता उघडून ग्राहकांची प्रतीक्षा करीत होते. ग्राहकही तब्बल दीड महिन्यानंतर बाजाराचा फेरफटका मारताना दिसून येत होते. जिल्हा प्रशासनाने वेळ वाढवून दिली असली तरी दुपारी २ वाजेनंतरही अनेक जण रस्त्यावर भटकंती करताना दिसत होते. मेन लाइनसह शहरातील विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त  होता. मात्र, नागरिकांच्या उत्साहापुढे तेही हतबल होते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार