शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वातावरणाची शेतकऱ्यात धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 23:00 IST

गत तीन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होऊन सायंकाळच्या वेळी वादळी वातावरण तयार होते. सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची सर कोसळते. या वादळामुळे आंबा, गहू, धान पिकांसह पालेभाज्यांचे मोठे नुकसान होत आहे. तर वादळानंतर रात्रभर वीज पुरवठा खंडित होतो. या वादळी वातावरणाची शेतकऱ्यात चांगलीच धडकी भरली आहे.

ठळक मुद्देपावसाच्या सरी : वादळामुळे वीज प्रवाह खंडित, वृक्ष उन्मळले

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत तीन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होऊन सायंकाळच्या वेळी वादळी वातावरण तयार होते. सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची सर कोसळते. या वादळामुळे आंबा, गहू, धान पिकांसह पालेभाज्यांचे मोठे नुकसान होत आहे. तर वादळानंतर रात्रभर वीज पुरवठा खंडित होतो. या वादळी वातावरणाची शेतकऱ्यात चांगलीच धडकी भरली आहे.हवामान खात्याने जिल्ह्यात वादळी वाºयासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. गत तीन दिवसांपासून सायंकाळ झाली की, अचानक वादळी वातावरण सुरु होते. सोसाट्याचा वारा वाहू लागतो. भंडारा शहरात या वादळामुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट उडतात. दुचाकी चालकांची मोठी धांदल उडते. अनेक जण डोळ्यात कचरा गेल्याने दुचाकीवरून पडल्याच्या घटना घडत आहेत. भंडारा शहरासोबतच जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वातावरणाचा फटका बसत आहे.सोमवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास भंडारा तालुक्यासह लाखांदूर, लाखनी, साकोली, मोहाडी तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा बसला. रात्री भंडारा तालुक्यातील मुजबी, जवाहरनगर, सावरी, खात रोड परिसर, टवेपार आदी ठिकाणी पावसाची सर कोसळली.या वादळी पावसाचा सर्वाधिक फटका आंबा पिकाला बसत आहे. यंदा आंबे लदबदून लागले आहेत. गावरानी आंब्याची यंदा नव्हाळी होणार असे असताना दोन दिवसांपासून सुरु असलेल्या वादळी वातावरणाने झाडावरील आंबे गळून पडत आहेत. या सोबतच गहू आणि उन्हाळी धानपिकालाही फटका बसत आहे. भाजीपाला पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.यंदा निसर्ग शेतकऱ्यांवर कोपल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यात अपुरा पाऊस झाल्याने धानपिकाला फटका बसला. त्यानंतर गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा पिकांना बसला. आता पुन्हा वादळी वातावरण झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत.पालांदूर परिसरात तीन तास सोसाट्याचा वारापालांदूर : लाखनी तालुक्यातील पालांदूर येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाºयाने जनजीवन विस्कळीत केले. तब्बल तीन तास वारा घोंघावत होता. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. वीज पुरवठाही बंद झाला. काही ठिकाणी वीज खांब झाडावर पडल्याने रात्रभर वीज पुरवठा सुरळीत झाला नाही. चुलबंद खोºयातील मºहेगाव, नरव्हा आदी गावात उन्हाळी धानपीक सुकले आहे. मात्र पावसाळी वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. अनेक ठिकाणी वीज तारा लोंबकळत असल्याचे दृष्य आहे.वातावरणात गारवागत तीन दिवसांपासून वादळी वातावरणामुळे ढगाळ परिस्थिती निर्माण झाली. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे नागरिकांची कडक उन्हापासून सुटका झाली. तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत होते. सायंकाळच्या वेळी मात्र असह्य उकाड्याला प्रारंभ झाला.