शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

दस्तावेजांसाठी ‘स्टोअर रुम’चे काम सुरु

By admin | Updated: December 27, 2014 22:45 IST

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे महत्त्वपूर्ण दस्तावेज अस्तव्यस्त ठेवण्यात आले आहे. हे दस्तावेज असुरक्षित आहेत. याकडे कुणाचेच लक्ष नाही, या आशयाचे खळबळजनक वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित

देवानंद नंदेश्वर - भंडाराजिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे महत्त्वपूर्ण दस्तावेज अस्तव्यस्त ठेवण्यात आले आहे. हे दस्तावेज असुरक्षित आहेत. याकडे कुणाचेच लक्ष नाही, या आशयाचे खळबळजनक वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित करताच शनिवारी सुटीच्या दिवशी दस्तावेजांसाठी 'स्टोअर रुम'चे काम सुरु करण्यात आले आहे. कामाच्या देखरेखीसाठी दिवसभर कक्ष अधिकारी के. आर. खोब्रागडे तळ ठोकून होते.जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामधील महत्त्वपूर्ण दस्तावेज दि.२२ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेत आणण्यात आले होते. हे दस्तावेज जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या आवारात ठेवण्यात आले. आरोग्य विभागाचे महत्वपूर्ण दस्तावेज पश्चिम दिशेला असलेल्या प्रवेशद्वारा शेजारी वाहनांमार्फत आणण्यात आले. येथे मजुरांनी दस्तावेज अस्तव्यस्त पध्दतीने ठेवून दिले आहे. दस्तावेजांचे गठ्ठे विखुरलेले असताना तेथील बहुतांश कागदपत्रे फाटले तर काही चुरडलेले आहे. व्हरांड्यात दस्तावेजांचा ढीग लावलेला आहे. शेजारीच जिल्हा परिषदेला वीज पुरवठा करणारे संयत्र आहे. स्पार्किंग झाल्यास महत्त्वपूर्ण दस्तावेज जळून खाक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.चौथा शनिवार असल्यामुळे आज जिल्हा परिषदेला सुटी होती. तरीही 'लोकमत'च्या वृत्ताची दखल घेत आरोग्य विभागाने कर्मचाऱ्यांच्या कक्षात दस्तावेजांसाठी 'स्टोअर रुम'च्या कामाला झपाट्याने प्रारंभ केला. या कामावर तीन मजूर उपस्थित होते. सकाळपासून कामाच्या देखरेखीसाठी कक्ष अधिकारी खोब्रागडे तळ ठोकून होते. व्हरांड्यात असलेले विखुरलेले गठ्ठे जैसे थे आहेत. यातील काही गठ्ठे मजुरांनी उचलून कर्मचाऱ्यांच्या टेबलाखाली ठेवले आहेत. सोमवारपर्यत 'स्टोअर रुम'चे काम पुर्ण करावयाचे आदेश अधिकाऱ्यांचे असल्यामुळे शनिवार व रविवारी या दोन दिवसात मजुरांच्या माध्यमातून युध्दपातळीवर काम सुरु आहे.