शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

नियुक्तीसाठी कामगारांचे काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 23:47 IST

तालुक्यातील मारेगाव येथे स्थित महाराष्ट्र मेटल पावडर या कारखान्यात १० कंत्राटी कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून कमी केल्याच्या कारणावरून २०० च्या जवळपास कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे.

ठळक मुद्देविनासूचना काढले : मारेगाव येथील महाराष्ट्र मेटल कारखान्यातील प्रकार

आॅनलाईन लोकमतभंडारा : तालुक्यातील मारेगाव येथे स्थित महाराष्ट्र मेटल पावडर या कारखान्यात १० कंत्राटी कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून कमी केल्याच्या कारणावरून २०० च्या जवळपास कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. सदर कामगारांना परत घेण्याच्या मुद्यावर त्या कामगारांनी कंपनीसमोरच ठिय्या मांडला.तालुक्यातील मारेगाव येथे शहापूर नजीक ही कंपनी असून यात ४५० पेक्षा कामगार कार्यरत आहेत. यात १५० च्या जवळपास स्थायी कामगार असून अन्य कामगार कंत्राटदारांच्या अंतर्गत कंत्राटी स्वरुपात कार्य करतात. मंगळवारी विना सूचना १० कंत्राटी कर्मचाºयांना कामावर घेण्यास नकार देण्यात आला.हे सर्व कामगार ५ ते ७ वर्षांपासून येथे काम करीत आहेत. कसलीही पूर्व सूचना न देता व कारण न सांगता कामगारांना कामावरून का कमी केले असा प्रश्न उपस्थित करून अन्य कंत्राटी कामगारांनी सदर कर्मचाºयांना कामावर घेण्याच्या मागणीसाठी कंपनीसमोरच आंदोलन सुरु केले.सर्व कंत्राटी कामगारांनी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बोनसची मागणी केली होती. त्या संबंधाने सहाय्यक कामगार आयुक्तांनाही मागणीचे निवेदन दिले होते. बोनस अजूनपर्यंत कर्मचाºयांना मिळाले नाही. त्यामुळेच सुडबुद्धीने या कामगारांना काढण्यात आले काय? असा सवालही कंत्राटी कामगारांनी उपस्थित केला आहे. कामगारांना पूर्ववत कामावर घेण्यात यावे या मागणीला घेऊन कंपनीतील अन्य कंत्राटी कामगारांनीही कंपनीसमोरच आंदोलन सुरु केले आहे. या कामगारांना धोका उत्पन्न झाल्यास याची जबाबदारी कंपनी व्यवस्थापनाची राहील असेही या कामगारांनी निवेदनातून स्पष्ट केले आहे. सदर आंदोलनाला आॅल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) यांनीही पाठींबा दिला आहे. सदर मागणीचे निवेदन कंपनीच्या व्यवस्थापकांसह जिल्हाधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त व उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.आयटकचे कार्याध्यक्ष हिवराज उके, दयानाथ चव्हाण, हिरालाल चरडे, अशोक बाभरे, गोवर्धन मते, जितेंद्र राऊत, राजू शेंडे, नागेश्वर मेश्राम, अमर बागडे, संजय वासनिक, जितेंद्र शेंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.प्रतिसाद मिळेनायासंदर्भात एमएमपीआयएलचे महाव्यवस्थापक मिलिंद खेर यांच्याशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर ‘लोकमत’ प्रतिनधीने संपर्क साधला असता, त्यांनी फोन उचलला खरा पण प्रश्न विचारण्यापूर्वीच फोन कट केला.