शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद प्रशासनाविरुद्ध रास्ता रोको

By admin | Updated: July 26, 2016 00:42 IST

स्थानीय मालविय नगरातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या तलावात मासोळ्यांच्या मृत्युचे तांडव सुरू आहे.

आजार पसरण्याची भीती : मृत मासोळ्याच्या दुर्गंधीमुळे तीन वार्ड प्रभाविततुमसर : स्थानीय मालविय नगरातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या तलावात मासोळ्यांच्या मृत्युचे तांडव सुरू आहे. पालिकेने तिथे कर्मचारी पाठवून चार ट्रॅक्टर मासोळ्या तलावाबाहेर काढून जमिनीत पुरल्या परंतु मासोळ्या मृत्युचे प्रमाण वाढतच आहे. दुर्गंधीमुळे तीन वॉर्ड प्रभावित झाले आहे. तेथील बालकांना रुग्णालयात दाखल केले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आले असताना जिल्हा परिषद प्रशासनाने दखलही घेतली नसल्यामुळे नगराध्यक्ष व नगरसेवक व नागरिकांसह सोमवारला दुपारी ३ वाजता दरम्यान बावनकर चौकात एक तास रस्ता रोको रोखून धरला.सदर तलाव हा जिल्हा परिषदेच्या मालकीचा असून तो तलाव दर पाच वर्षांनी पंचायत समितीमार्फत लिलाव करून त्याचा महसूल जिल्हा परिषद घेत आहे. तलावाची देखभाल दुरूस्ती करणे हे जिल्हा परिषदेचे काम आहे. परंतू सदर तलाव हा पालिका हद्दीत येत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पालिकेद्वारे स्वच्छता करण्यात येते. तीन दिवसापासून तलावात मासोळ्या मृत पावत असल्याचे दिसून येताच न.प. ने कर्मचारी पाठवून मृत मासोळ्यांना तलावाबाहेर काढण्याचे काम करीत आहेत. मृत मासोळ्याची दुर्गंधीमुळे पालिका कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. आज मृत मासोळ्याचे प्रमाण वाढले असून आतापर्यंत चार ट्रॅक्टर मृत मासोळ्या तलावाबाहेर काढून जमिनीत पुरण्याचे कार्य पालिकेद्वारे सुरू आहे. मृत मासोळ्याच्या दुर्गंधीमुळे शहरातील आझादनगर, रजा नगर, मालवीय नगर प्रभावित झाले असून शंभराच्यावर बालकांना येथील उपजिल्हा रुग्णालयात भर्ती करण्यात आले. याबाबत जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी सपंर्क साधले असता मला काहीच कल्पना नाही असे उत्तरे मिळाल्याने प्रशासनाला जाग आणण्याकरिता नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी त्यांचे नगरसेवक व प्रभावित झालेल्या नागरिकासह बावनकर चौकात एक तास रस्ता रोखून धरल्याने सर्व प्रशासकीय यंत्रणा खळबळून जागी झाली व तहसिलदार गौंड यांनी घटना स्थळाला भेट देवून बाहेरून कुमुक बोलविण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन तृर्तास मागे घेतले. यावेळी नगराध्यक्ष अभिषेक कोरमोरेसह नगरसेवक राजेश देशमुख, सलाम तुरकर, आशिष कुकडे, संदीप पेठे, जाकिर तुरक, राकेश धार्मिक, मनिष अग्रवाल, सरोज भुरे, सुरेश मलेवार, दिलीप भोंडेकर, दिनेश मलेवार, निशिकांत पेठे, अंकुश ठाकूरसह मालवीय नगर, रजानगर व आझादनगरचे प्रभावित झालेले नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी )