ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड : गावकऱ्यांचा आंदोलनाचा पवित्राचुल्हाड (सिहोरा) : मोहगाव खदान गावात विद्युत ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड झाला आहे. यामुळे चार दिवसांपासून नागरिकांना पाणी पुरवठा करणारी नळ योजना बंद आहे. ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट होत आहे. पाण्यासाठी गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील दिड हजार लोकवस्तीच्या मोहगाव खदान गावात दोन नळ योजनेतर्फे नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. ग्राम पंचायतसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना अशा स्वतंत्र नळ योजना आहेत. या योजनांना घराची विभागणी करण्यात आली आहे. दोन्ही नळ योजनांना स्वतंत्र विद्युत ट्रान्सफार्मरची सोय करण्यात आली आहे. विद्युत पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफार्मरमध्ये तांत्रिक बिघाड आलेला आहे. या संदर्भात सिहोरा विज वितरण कंपनी कार्यालयात तक्रार देण्यात आली. परंतु साहित्य नसल्याचे सांगण्यात येत आहे. पाणी पुरवठा योजना बंद असल्याने गावकऱ्याची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. पिण्याचे पाणी गावकऱ्यांना प्राप्त होत नसल्याने त्यांच्यात असंतोष खदखदत आहे. उन्हाळ्याची चाहुल लागताच सुर्य आग ओकत आहे. विज वितरण कंपनीचे शाखा अभियंताचे निष्क्रियतेमुळे गावकऱ्यावंर भिषण पाणी टंचाईचा सामना करण्याची पाळी आली आहे. या कार्यालयात एस.एम. झलके या शाखा अभियंतांचा प्रशासकीय कारभार संताप आणणारा ठरत आहे. त्यांना सिहोरा १ या क्षेत्रात येणाऱ्या नावांची जबाबदारी देण्यात आली असून जनतेच्या समस्या निकाली काढण्यासाठी भ्रमणध्वनी देण्यात आली आहे. भ्रमणध्वनी क्रमांकावर कुणी संपर्क साधल्यास शाखा अभियंता प्रतिसाद देत नाही. साधे फोन उचलण्याचे सौजन्य दाखवित नाहीत. त्यांचे वास्तव्य मध्यप्रदेशातील १८ कि़मी. अंतरावरील मौरजड गावात आहे. रात्री कुणी भ्रमणध्वनीवर संपर्क साधल्यास रोमींगची अट पुढे करून भ्रमणध्वनी उचलत नाहीत. यामुळे विज ग्राहकांना न्याय मिळत नाही. मोहगाव खदान गावात विद्युत ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड झाल्याने पाणी टंचाई सुरू झाली आहे. या संदर्भात शाखा अभियंता झलके यांचे शासकीय क्रमांकाच्या भ्रमध्वनीवर प्रतिक्रियासाठी संपर्क साधण्यात आले. परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. (वार्ताहर)विद्युत ट्रान्सफार्मरचे एक हंडा जळाल्याने नळ योजना बंद आहे. या संदर्भात विज वितरण कंपनी कार्यालयात माहिती देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. विज पुरवठा सुरळीत करण्यास विलंब झाल्यास आंदोलनाचा पवित्रा घेणार आहे.- उमेश्वर कटरे, उपसरपंच मोहगाव (खदान)
मोहगावात पाणी पुरवठा बंद
By admin | Updated: April 5, 2015 00:48 IST