शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बसफेरीसाठी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 22:25 IST

बसफेरीच्या मागणीसाठी बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चा लाखांदूर व शालेय विद्यार्थ्यांनी संबंधित विभागाला दोन, तिन वेळा निवेदन सादर केले होते. मागण्या पूर्ण न झाल्याने सोमवारला सकाळी १० वाजतापासून सलग चार तास पवनी लाखांदूर मार्गावरील चुलबंद नदीकाठावरील शंकर मंदिरासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देराज्यमार्गावरील वाहतूक चार तास ठप्प : चारशे विद्यार्थ्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : बसफेरीच्या मागणीसाठी बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चा लाखांदूर व शालेय विद्यार्थ्यांनी संबंधित विभागाला दोन, तिन वेळा निवेदन सादर केले होते. मागण्या पूर्ण न झाल्याने सोमवारला सकाळी १० वाजतापासून सलग चार तास पवनी लाखांदूर मार्गावरील चुलबंद नदीकाठावरील शंकर मंदिरासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. चार तास चक्का जाम असल्याने सर्वांचेच टेंशन वाढले होते.लाखांदुरचे नायब तहसीलदार विजय कावळे, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता मेटकर, शहारे, आगार व्यवस्थापक शेंडे, गुणवंत तागडे, जि. प. सदस्य मनोहर राऊत, सरपंच संघटना अध्यक्ष जितू पारधी यांनी आंदोलनाला भेट देऊन विद्यार्थ्यांंच्या समस्या जाणून घेतल्या. पावसाने सुरवात केल्यानंतर ही आंदोलन चालु होते.तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत पिंपळगाव कोहळी ते मडेघाट, कन्हाळगाव ते मेंढा चप्राड, रामा ३५४ ते सावरगाव, रामा ३५४ ते खैरीपट, रामा ३५४ आसोला ते मांदेड, रामा ३५४ परसोडी नाग ते कुडेगाव, रामा ३५४ ते रोहनी, दोनाड ते किरमटी, प्रजिमा ३९ घोडेझरी ते पालेपेंढरी, प्रजिमा ३८ सोनेगाव ते पेंढरी या रस्त्यांचे एकाचवेळी चालु करण्यात आले असून, कंत्राटदाराकडून कासवगतीने काम केले जात असल्याने हे रस्ते खोदून ठेवलेले आहेत. त्यामुळे लाखांदूर ते मोहरणा, लाखांदुर ते भागडी मार्ग धावणारी बससेवा बंद पडली असल्याने विद्यार्थ्यांंना शाळेला जाता येत नसून शैक्षणिक नुकसान होत आहे.आंदोलना दरम्यान आगार व्यवस्थापक शेंडे व तागडे यांनी नियमीत बस फेरी चालु करण्याचे सांगितले व नायब तहसीलदार कावळे यांनी संबंधित विभागाला नादुस्त असलेल्या रस्त्यांचे तांत्काळ काम करण्यास सांगितल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनात बिआरव्हिएमचे निशांत बडोले, शारूख पठान, त्रिलोक बडोले, आशिष गजभिये, अश्विन मोटघरे, पंकज नान्हे, निलेष मोटधरे, तरबेज पठान, मयुर ब्राम्हणकर, भरत गजापुरे, सुनिल कांबळे यांच्यासह डाँ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, जि. प. हायस्कुल, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शिक्षण घेणारे चारसेच्या आसपास विद्यार्थ्यी उपस्थित होते. अनुचित घटना घडणार नाही, यासाठी पोलीस उपनिरीक्षक के. के. गेडाम यांच्या नेतृत्वात पोलीसांचा चोख बंदोबस्त होता.