शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

शिवसेनेचा डोंगरीत रस्ता रोको

By admin | Updated: June 8, 2017 00:20 IST

९५ दिवसांपासून पीडित कुटुंबावर होत असलेल्या डोंगरी मॉईल प्रशासनाच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थ तथा शेतकऱ्यांनी १५ मेपासून मॉईलच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.

‘मॉयल’समोर आंदोलन : आंदोलनात पीडित कुटुंब सहभागीलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : ९५ दिवसांपासून पीडित कुटुंबावर होत असलेल्या डोंगरी मॉईल प्रशासनाच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थ तथा शेतकऱ्यांनी १५ मेपासून मॉईलच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. तत्पूर्वी ५ मार्चपासून साखळी उपोषण सुरु केले. परंतु खाण प्रशासन पीडित कुटुंबाची दखल घेतली नाही. त्यामुळे शिवसेनेने खाणग्रस्त पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी बुधवारला आंदोलन केले.यापूर्वी शिवसेनेने अधिकाऱ्यांशी चारवेळा चर्चा केली. ५ जूनपर्यंत खाणग्रस्त पीडित कुटुंबांच्या मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी दिले होते. परंतु मागण्या मान्य झाल्या नाही. मॉईलमध्ये ब्लास्टींगच्या दररोज झटक्यामुळे परिसरात राहत असलेल्या नागरिकांना खुप त्रास सहन करावा लागत असून त्यांच्या घरांच्या भिंतीना तडे गेले आहेत. परिसरातील खाणग्रस्त पीडित कुटुंबाच्या पुनर्वसन सुरक्षित ठिकाणी करण्यात यावे, मॉईल परिसरातील खाणग्रस्त पीडित कुटुंबांच्या जमिनी प्रकल्पात गेलेल्या पीडित कुटुंबाच्या नोकऱ्या देण्यात यावे, मॉईल मधील खाणग्रस्त पीडित कुटुंबाच्या शेतामधून जात असलेला दूषित पाणी थांबविण्यात यावे, जेणेकरून त्यांना शेती करता यावी, मॉईलचा उत्खननामुळे होत असलेल्या ढिग हे दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करावे, जेणेकरून सूर्यकिरण मिळून त्यांचे आरोग्य चांगले राहील व प्रदूषणमुक्त राहता येईल, या मागण्या पीडित कुटुंबांनी उपोषणस्थळी केल्या आहेत. यावेळी उपोषणस्थळी मॉईल अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले होते. परंतु मॉईल प्रशासनाने याची दखल न घेतल्यामुळे शिवसेनेने मॉईलच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर चार तास रास्ता रोको करून गावकऱ्यांनी रस्त्यावर टायर जाळले.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले, उपजिल्हा प्रमुख व पंचायत समिती उपसभापती शेखर कोतपल्लीवार, सुधाकर कारेमोरे, संदीप वाकडे, अमीत मेश्राम, तालुकाप्रमुख नरेश उचिबगले, किशोर चन्ने, उपतालुकाप्रमुख प्रकाश लसुन्ते, युवासेना उपजिल्हा प्रमुख मनोज चौबे, शिवसेना शहर प्रमुख नितीन सेलोकर, उपशहर प्रमुख जगदीश त्रिभुवनकर, वाहतूक सेना शहरप्रमुख किशोर यादव, उपशहर प्रमुख कृपाशंकर डहरवाल, दिलीप सिंगाडे, धर्मेंद्र धकेता, नरेश टेंभरेसह शिवसैनिक व पीडित ग्रामवासीयांनी मॉईलच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शिवसैनिकांनी ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणा दिल्या. दरम्यान तहसीलदार गजेंद्र बालपांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, पोलीस निरीक्षक नागरे आंदोलनस्थळी पोहचले आणि आंदोलनकर्त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला.