शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

आता तरी थांबवा ‘अ‍ॅट्रासिटी’ कायद्याचा दुरुपयोग

By admin | Updated: September 8, 2015 00:37 IST

जातीय भेदभावाचा सामना करणाऱ्या तसेच अत्याचार सोसणाऱ्या दलीत समाजाला संरक्षण देण्यासाठी अ‍ॅट्रासिटी ..

परमानंद मेश्राम यांचे आवाहन : एकोपा कायम ठेवण्याची गरजभंडारा : जातीय भेदभावाचा सामना करणाऱ्या तसेच अत्याचार सोसणाऱ्या दलीत समाजाला संरक्षण देण्यासाठी अ‍ॅट्रासिटी कायदा बनविण्यात आला होता. या कायद्यामुळे जातीच्या आधारावर अत्याचार कमी झाले. परंतु काही लोकांकडून आपल्या गोरखधंद्यावर पडदा घालण्यासाठी ‘अ‍ॅट्रासिटी’ कायद्याचा दुरुपयोग होत आहे. दुरुपयोग करणाऱ्या लोकांची पार्श्वभूमी आणि त्यांचा उद्देश तपासून कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम यांनी केली आहे.भंडारा जिल्ह्यात झालेल्या एकामागून एक अशा तीन घटना घडल्यानंतर अ‍ॅट्रासिटी कायद्यांतर्गत होणाऱ्यात तक्रारीसंदर्भात ते म्हणाले, भंडारा शहरात गांजा व्यवसायिकांविरुद्ध नागरिकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर टाकळी येथील नागरिकांनी एका गांजा व्यावसायिकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर या व्यावसायिकांनी अ‍ॅट्रासिटी कायद्यांतर्गत टाकळी वासीयांच्या विरोधात तक्रार दिली. भंडारा येथील सहकारनगर येथे अतिक्रमण कारवाईदरम्यान नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एका राजकीय पदाधिकाऱ्याने नगर पालिकेच्या कर्मचाऱ्याच्या थोबाडीत हाणली. त्यांच्या अटकेच्या मागणीमुळे पालिका कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. मारहाणीच्या दोन दिवसानंतर पालिका कर्मचाऱ्याच्या विरुद्ध अ‍ॅट्रासिटी कायद्यांतर्गत तक्रार देण्यात आली. पवनी येथील तहसील कार्यालयात झालेल्या वादानंतर तहसीलदार आणि पुरवठा निरिक्षक यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रासिटी कायद्यांतर्गत तक्रार देण्यात आली. त्यानंतर महसुल कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन पुकारले. हे आंदोलन भंडाऱ्यात जिल्हाधिकारी यांच्याकडे नेण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे शिष्टमंडळ घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे घेऊन गेले. तिथे अधिकारावरुन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यातच खडाजंगी झाली. त्यानंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांना अटक केली. अटकेतील लोक जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन आता पवनीचे तहसीलदार व पुरवठा निरीक्षक यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रासिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे पूर्वीच्या तक्रारीत जातिवाचक शिवीगाळ नसताना अटक केल्यानंतरच्या तक्रारीत जातिवाचक शिवीगाळ केल्याची खोटी तक्रार करण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे हा कायद्याचा दुरुपयोग नाही कां? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे अ‍ॅट्रासिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करताना पोलीस प्रशासनाने दुरुपयोग करणाऱ्या लोकांची पार्श्वभूमी आणि त्यांचा उद्देश तपासून कारवाई करण्याची गरज आहे. जेणेकरुन दोन समाजातील एकोपा कायम ठेवता येऊ शकतो, कायद्याचा दुरुपयोग करण्याच्या प्रकारामुळे दोन समाजातील कटूता वाढत आहे, त्यामुळे यावर आळा घालण्याची मागणीही परमानंद मेश्राम यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)