शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

रेतीच्या अवैध वाहतुकीवर आळा घाला

By admin | Updated: June 2, 2015 00:31 IST

जिल्ह्यातील अवैध रेती वाहतुकीवर तत्काळ आळा घालण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार...

त्रिमूर्ती चौकात उपोषण : टाकळी परिसरात रेतीचे ढिगारेभंडारा : जिल्ह्यातील अवैध रेती वाहतुकीवर तत्काळ आळा घालण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय मंचच्या वतीने आज सोमवारी सकाळी ११ वाजतापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला प्रारंभ करण्यात आला. भंडारा जिल्ह्यातील रेतीघाटावरून क्षमतेपेक्षा जास्त रेती ट्रक-ट्रॅक्टरमध्ये भरून दिल्या जात आहे. रेती वाहतुकीमुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे. भंडारा शहरात अनेक ठिकाणी कोट्यवधी रूपयांची अवैध रेतीचा साठा जमा केलेला आहे. हा सर्व प्रकार सुरू असतानाही जिल्हा प्रशासनासह तालुका प्रशासन मुग गिळून गप्प बसले आहेत. कारवाई करण्यास टाळाटाळ होत आहे. याकरीता अवैध रेती वाहतूक बंद करण्यात यावे, नादुरूस्त रस्ते दुरूस्त करण्यात यावे, रेतीमाफियांच्या संपत्तीची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी, ज्या रेतीमाफियांवर तीन पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत अशांवर मोका कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना जिल्हा बंदी करण्यात यावी, शहरात बेकायदेशीर जमा असलेली रेती शासन दरबारी जमा करावी व त्याचा तात्काळ लिलाव करण्यात यावा, संयुक्त समिती नेमूण अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अवैध गौण खनिज चोरीसाठी वीज धारकास जबाबदार धरणे आवश्यक आहे, त्यांच्यावरच कारवाई करण्यात यावी, जिल्ह्यातील रेती उत्खनन करण्यासाठी आतापर्यंत लीज धारकांनी किती मनुष्यबळ लावला, त्याची योग्य चौकशी होवून कारवाई करण्यात यावी, जेसीबीद्वारे रेती उत्खनन करण्याची मनाई असताना कुणाच्या आशिर्वादाने जेसीबीद्वारे उत्खनन करता याची शहनिशा करण्यात यावी आदी मागण्यांसाठी उपोषणाला प्रारंभ करण्यात आला आहे. निवेदन जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. उपोषणाला सुरज परदेशी, मेहमुद अली, विजय क्षीरसागर, विष्णूदास लोणारे, पुरूषोत्तम कांबळे, दलिराम भुते, त्रिवेणी वासनिक, अजय वासनिक यांचा सहभाग आहे. (नगर प्रतिनिधी)