बाळा काशिवार : ३४ लाभार्थ्यांना उज्ज्वला गॅस सिलिंडरचे वाटप लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : संपूर्ण सृष्टी ही नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून आहे. यातील वनसंपदा महत्वाची आहे. वृक्ष कटाईला आळा बसावा व पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी केंद्र शासनाने उज्ज्वला योजना सुरू करून गॅस सिलेंडरचे वाटप सुरू केले. तेव्हा वृक्ष कटाई थांबवून वनसंपदेचा ऱ्हास थांबविण्याचे आवाहन आमदार बाळा काशिवार यांनी केले.लाखांदूर तालुक्यातील ईंदोरा येथे 34 लाभाथ्यार्ना गॅस सिलेंडरचे वाटप प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगीता. भाजपा अध्यक्ष नूतन कांबळे, वन परीक्षेत्राधिकारी दोनोडे, गोसू कुंभरे, रज्जू पठाण, विजय खरकाटे, सुनीता ठेंगरी, गोपाल शहारे, राधेश्याम मुंगमोडे, मोतीराम गेडाम, हरिषचंद्र धोटे, वनपाल पंचभाई, वनरक्षक के.टी. बगमारे, मंजलवार, मुख्याध्यापक ढोरे, यांच्या उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, मानव व प्राण्यांचे संपूर्ण जीवन हे वनसंपदेवर अवलंबून आहे. संयुक्त वानव्यवस्थापन समित्या प्रत्येक गावात स्थापन करून जंगलाचे रक्षण, व्यवस्थापन व संगोपन करण्याची जबाबदारी देऊन आर्थीक उन्नती करण्यासाठी योजना शासनाने सुरु केल्या त्यांचा लाभ घेण्याचा आग्रह यावेळी जनतेला केला. वन परीक्षत्राधिकारी दोनोडे यांनी जंगलाचे महत्व व जंगलामुळे वनव्यवस्थापन समित्यांनी आर्थीक प्रगती साधण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी गावातील नागरिक, वनव्यवस्थापन समित्यांचे सदस्य उपस्थित होते.परिसरात दुर्गंधीचे साम्राज्यलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील राम मंदिर वॉर्ड परिसरात असलेल्या श्रीराम मंदिरच्या मागील परिसरात शुभव कॉम्प्लेक्सच्या बाजूला असलेल्या नाली मागील कित्येक महिन्यांपासून उपसण्यात आली नाही. तसेच नालीवर कॉम्प्लेक्सच्या मलबा ठेवण्यात आल्याने नाली पुर्णत: बुजून सांडपाणी वाहून जाणे बंद झाले आहे. त्यामुळे नालीत गाळ साचलेले आहे व सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी व डासांचे प्रमाण वाढले आहे. तेथून ये-जा करणा-या नागरिकांना नाकावर रुमाल ठेवून जावे लागते. विशेष म्हणजे येथील नाली एक-एक महिना नाली उपसण्यात येत नाही. येथील कचरा घर बंद झाल्यामुळे नालीच्या आच्छादनावर कचरा टाकण्यात येतो.
वनसंपदेचा ऱ्हास थांबवा
By admin | Updated: May 9, 2017 00:27 IST