शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भ राज्य घेऊनच राहू

By admin | Updated: January 20, 2015 22:34 IST

नागपूर करार आणि विदर्भ वैधानिक विकास महामंडळ हे विदर्भाच्या विकासात अडसर ठरले आहे. कालबाह्य झालेल्या या व्यवस्था बंद करुन केंद्र व राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या

सिंदखेडराजा-गडचिरोली यात्रा : वामनराव चटप यांची माहितीभंडारा : नागपूर करार आणि विदर्भ वैधानिक विकास महामंडळ हे विदर्भाच्या विकासात अडसर ठरले आहे. कालबाह्य झालेल्या या व्यवस्था बंद करुन केंद्र व राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करणे गरजेचे आहे. ‘पंधरा दोन पंधरा - विदर्भ मिळवू औंदा’ हा विदर्भ राज्य आंदोलन समितीचा नारा असल्याचे प्रतिपादन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक अ‍ॅड. वामनराव चटप यांनी आयोजित पत्रपरिषदेत केले.विदर्भ राज्य आंदोलन समितीची बैठक आटोपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी अ‍ॅड. चटप म्हणाले, कालबाह्य झालेल्या व्यवस्था विदर्भ आणि विदर्भातील जनतेवर अन्याय करीत आहेत. त्याचा विरोध करण्यासाठी आंदोलन समितीने नागपूर कराराची होळी केली आहे. विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचा कार्यकाळ यावर्षी एप्रिल महिन्यात पूर्ण होत आहे.सरकार या महामंडळाचा कालावधी वाढविण्याच्या तयारीत आहे. याला समितीने विरोध केला आहे. या महामंडळाचा कार्यकाळ वाढविण्यापेक्षा स्वतंत्र विदर्भ राज्याचा प्रस्ताव ठेवावा, अशी आमची मागणी आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती हे सद्यस्थितीत पहिली गरज आहे. सरकार आर्थिक संकटांत आहे. विदर्भाचा अनुशेष लागोपाठ वाढत आहे. अलिकडेच केळकर समितीने अनुशेष भरुन काढण्यासाठी ४.५० लाख कोटी रुपयांची गरज असल्याचे अहवालात नमूद केले आहे. पहिलेच राज्य सरकारवर ३.४४ लाख कोटी रुपयांचे कर्ज असून २३ हजार कोटी व्याज भरावे लागत आहे. यावर्षी पडलेल्या दुष्काळामुळे राज्य सरकारला २६ हजार कोटी रुपयांचे महसुली नुकसान सहन करावे लागणार आहे. परिणामी अंदाजपत्रकात ४० टक्के कपातीचा निर्णय घ्यावा लागला. हा विदर्भावर अन्याय नाही का? असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला. पत्रपरिषदेला माजी राज्यमंत्री डॉ. रमेश गजबे, राकाँचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, अ‍ॅड. पद्माकर टेंभुर्णे, दुर्वास धार्मिक, रमाकांत पशिने, सदानंद धकाते, दामोधर क्षीरसागर, डॉ.श्याम नंदनवार, बी. एम. गजभिये, सौरभ दिवटे, अविनाश पनके, तुषार हटेवार, उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)