शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

भटक्यांची स्थिती आजही विदारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 23:48 IST

देश महासत्ता होऊ पाहत असताना दुसरीकडे दारिद्र्याचे चटके सहन करणारे अनेक कुटुंब विकासाच्या प्रतीक्षेत आहेत़ दोन वेळचे जेवण,

ठळक मुद्देहेरंब कुलकर्णी : भटक्यांच्या तांड्यावर दिल्या भेटी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : देश महासत्ता होऊ पाहत असताना दुसरीकडे दारिद्र्याचे चटके सहन करणारे अनेक कुटुंब विकासाच्या प्रतीक्षेत आहेत़ दोन वेळचे जेवण, आरोग्याचे प्रश्न आणि उच्च शिक्षणासाठीही त्यांच्या कुटुंबात दारिद्रय आहे़ भंडारा जिल्ह्यात भटक्यांची स्थिती प्रचंड विदारक असल्याची खंत साहित्यिक हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केली़हेरंब कुलकर्णी हे भंडारा जिल्ह्यातील भटक्या विमुक्त जमातीतील नागरिकांचे राहणीमान व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आले असताना त्यांनी हे निरीक्षण नोंदविले. भटक्या विमुक्त जमातीतील समाजाची समस्या दूर व्हावी, यासाठी २०११ मध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरू झाली. यासाठी दरवर्षी १० कोटी रूपयांचा निधीची तरतूद करण्यात आली़ मात्र, या ७ वर्षांच्या काळात यवतमाळ व लातूर या दोन जिल्ह्यात प्रत्येकी ४० असे ८० घर या घटकासाठी बांधण्यात आली़. परंतु उर्वरित जिल्ह्यात एकही निधी खर्च करण्यात आला नाही़भंडारा जिल्ह्यात मांग, गारूडी, वडार, गोपाळ, बहुरूपी म्हणून ओळख असलेला हा समाज भटकंती करूनच जीवन जगत आहे़ आजही या समाजाला रेशन कार्ड, मतदानपत्र या योजनांपासून जोडण्यात आले नाही़ शासन अन्नसुरक्षा योजनेतून प्रत्येकांना अन्न पुरविण्याचे सांगत असले तरी या समाजाला अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित राहावे लागत आहे़ हा विषय सामाजिक न्यायाचा असल्यामुळे भटक्या विमुक्त जमातीचा विकास होण्याची गरज होती. राज्यातील सर्वच जिल्ह्यात जाऊन गरीब तालुका व गरीब गाव यातील तफावतीचा अहवाल डिसेंबर महिन्यात शासनाला सादर करणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील चोरखमारी, भिलेवाडा कारधा, गिरोला येथील वसाहतीवर भेटी देऊन समस्या जाणून घेतल्या़ याठिकाणी मूलभूत गरजांपासून वंचितांच्या वाड्यांमध्ये पालावरची शाळा सुरू केल्यामुळे विद्यार्थी आता शिक्षण घेताना दिसत आहेत, हे स्वागतार्ह बाब आहे. या भेटीदरम्यान कुलकर्णी यांच्यासोबत संघर्ष वाहीनीचे दिनानाथ वाघमारे, भटके परिषदेचे गोविंद मकरे, मनोज केवट, के़ एऩ नान्हे उपस्थित होते़