लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : शेतकरी पिकविम्यापासून वंचित राहू नये यासाठी शासनाने पर्यायी व्यवस्था करावी, या मागणीसाठी शेतकºयांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.पिकविमा काढण्याची शेवटचे दोन दिवस होते मात्र तांत्रिक अडचणीमुळे पिकविमा निघाला नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.महाराष्ट्र सरकारने पिकदिल्याबाबत आॅनलाईन प्रक्रिया सुरू केली. यानुसार शेतकरी आॅनलाईन अर्ज करण्यासाठी गेले असता तेथील ‘सर्व्हर डाऊन’ असल्यामुळे शेतकºयांचे अर्जच स्विकारण्यात आले नाही. हा पिकविमा काढण्याची शेवटची मुदत ही ४ आॅगस्ट तारीख शेवटची होती. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी पिकविमा आॅफलाईन स्वीकारले जातील, अशी माहिती माध्यमांद्वारे दिली.मात्र बँकेचे अधिकारी सांगतात की, आम्हाला लेखी आदेश नाही त्यामुळे आम्ही आॅफलाईन अर्ज स्वीकारू शकत नाही, असे सांगत अर्ज स्वीकारले नाही. यासंदर्भात शेतकºयांनी उपविभागीय अधिकाºयांना निवेदन देऊन चर्चा केली. यावर तोडगा निघाला नाही म्हणून शेतकºयांनी साकोली उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एक तास ठिय्या आंदोलन केले.बारा तासात यावर तोडगा निघाला नाही तर पुन्हा उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करू, असा इशाराही या शेतकºयांनी दिला.या ठिय्या आंदोलनात नगरसेवक अॅड. मनिष कापगते, प्रकाश कठाणे, रविकांत पेटकर, अशोक गुप्ता, रामकृष्ण कापगते, दिलीप खांडेकर, वसंता रंगारी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण बडोले, लाला क्षीरसागर, रघुनाथ टेंभरे, धनराज बोरकर, पुरूषोत्तम लांजेवार, चरणदास कोटांगले, हेमकृष्ण कठाणे, मारोती पटले, प्रताप चुघ, नामदेव टेंभुर्णे, राऊत, एकनाथ दोनोडे, चोपराम जांभुळकर व किशोर बावणे सहभागी होते.
साकोलीत पिकविम्यासाठी ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:17 IST