शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

कामे सुरू असतानाच राज्य महामार्ग उखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:00 IST

तालुक्यातील सिंदपुरी, विरली (बुज), लाखांदूर, अर्जुनी (मोरगाव) या राज्य महामार्गाचे अलिकडेच भूमिपुजन होऊन कामांना प्रारंभ झाला. परंतु बांधकाम सुरू असतानाच या रस्त्याची दुरावस्था झाली असून अपघात होण्याइतपत स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांची कारवाईची मागणी : सिंदपुरी, विरली, लाखांदूर महामार्गाची दुरावस्था

आॅनलाईन लोकमतलाखांदूर : तालुक्यातील सिंदपुरी, विरली (बुज), लाखांदूर, अर्जुनी (मोरगाव) या राज्य महामार्गाचे अलिकडेच भूमिपुजन होऊन कामांना प्रारंभ झाला. परंतु बांधकाम सुरू असतानाच या रस्त्याची दुरावस्था झाली असून अपघात होण्याइतपत स्थिती निर्माण झाली आहे.मागील अनेक दिवसांपासून रखडलेल्या सिंदपुरी, विरली (बुज), लाखांदूर ते अर्जुनी (मोरगाव) या १४ ते २८ कि.मी. लांबीच्या या राज्य महामार्गाच्या देखभाल व दुरूस्तीसाठी सन २०१७-१८ अंतर्गत आमदार बाळा काशिवार यांनी तीन कोटी रूपयांचा निधी खेचून आणला. १० मार्च रोजी भुमिपुजन होताच १० दिवसातच या मार्गाच्या कामांना सुरूवात करण्यात आली़. मात्र ज्या कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.सद्यस्थितीत आसोला, परसोडी (नाग) परिसरात कामे सुरू असून प्रथम या महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांची डागडुजी केली जात आहे. त्यात डांबराचे कमी प्रमाण व रोलर न फिरविल्यामुळे डांबरीकरण उखडले असून बारीक गिट्टी रस्त्यावर पसरली आहे. भरधाव वाहनांच्या चाकाला ही गिट्टी चिपकूप छोट्या वाहनचालकांना धोकादायक ठरत आहे. यामुळे बारीक चुरी असल्याने प्रवाशांच्या डोळ्यात उडून अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.भुमिपुजन कार्यक्रमात आमदार बाळा काशिवार यांनी या मार्गाचे काम चांगल्या दर्जाचे व्हावे, यासाठी प्रत्येक गावकऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, असे सांगितले होते. त्यामुळे या परीसरातील ग्रामस्थांनी या मार्गाचे काम चांगल्या दर्जाचे करून निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी केली आहे. याबाबत सदर कंत्राटदाराला विचारले असता ‘काम चांगल्या दर्जाचे सुरू असून काम सुरू असताना वाहतुकीमुळे डांबर उखडले’ असल्याचे त्यांनी सांगितले.या महामार्गाचे काम चांगल्या दर्जाचे केले जात आहे. मात्र काम सुरू असताना जडवाहतुकीच्या वाहनांमुळे उखडला आहे.- आर.एम.ठाकूर, शाखा अभियंता, बांधकाम विभाग लाखांदूर.संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगनमतातून हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे कंत्राटदारावर कारवाई झालीच पाहिजे.- शिवाजी देशकर,उपसभापती पं.स.लाखांदूर.संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.- राहुल राऊत,माजी उपसरपंच ओपारा.