शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
4
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
5
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
6
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
7
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
8
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
9
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
10
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
11
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
12
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
13
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
14
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
15
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
16
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
17
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
18
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
19
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
20
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल

राज्य मार्गावरील शासकीय जागा वादाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: November 26, 2014 23:01 IST

उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय, पवनी येथील कार्यालयाकडून सरकारी जागेची मोजणीबाबत कोसरा ग्रामपंचायतीची दिशाभूल केली, असा आरोप सरपंच व सदस्यांनी वरिष्ठांना पाठविलेल्या पत्रात केला आहे.

कोंढा कोसरा : उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय, पवनी येथील कार्यालयाकडून सरकारी जागेची मोजणीबाबत कोसरा ग्रामपंचायतीची दिशाभूल केली, असा आरोप सरपंच व सदस्यांनी वरिष्ठांना पाठविलेल्या पत्रात केला आहे.कोसरा येथील ग्रामपंचायतनी पवनी- भंडारा राज्यमार्गावर पॉवर स्टेशन समोर असलेली २ गटाची जागा मोजण्यासाठी ६ हजार रुपये अति तात्काळ मोजणीसाठी फी पवनी येथे उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात भरले. त्यानुसार १४ आॅगस्ट २०१४ सर्वेआर हटवार यांच्यातर्फे जमिनीची मोजणी सुरु असताना अचानक पाऊस आल्याने मोजणी पूर्ण झाली नाही. तसेच मोजणी करणारे सर्वेअर हटवार यांनी दोन ते तिन दिवसात मोजणी पूर्ण करून हद्द कायम करून क प्रत देण्याचे सांगितले. यानंतर तेव्हापासून त्यांनी मोजणी न केल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी आहे. या संबंधात ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांनी उपअधीक्षक यांची भेट घेऊन मोजणी पूर्ण का केली नाही असे विचारले असता त्यांनी सदर दोन गटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. स्व.लक्ष्मण मोटघरे चॅरीटेबल ट्रस्टच्या व्यवस्थापनाविरुद्ध सरकारी जागेवर अतिक्रमण केले. यासंबंधी केश सन २००९ मध्ये ग्राम पंचायत कोसरा यांनी दाखल केली आहे. त्यामुळे मोजणी अंतिम करता येत नाही असे सांगितले. मग ग्राम पंचायतकोसरा येथील सरपंच व ग्राम पंचायत सदस्य यांचे म्हणणे आहे की प्रकरण न्यायालयात असताना स्व.लक्ष्मण मोटघरे चॅरीटेबलच्या व्यवस्थापनाला कॉलेजसाठी सरकारी जागेवर अतिक्रमण करून बांधकाम करता येते का? असा प्रश्न ते विचारीत आहेत. मोजणी संबंधी ग्राम पंचायत ने ६ हजार रुपये भरले. मोजणीसंबंधी तारीख निश्बित केली. मोजणी सुरु असताना स्व.लक्ष्मणराव मोटघरे चॅरीटेबल ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. नंतर उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय पवनी येथील अधिकाऱ्यांवर दबाव आणून मोजणी संबंधात निर्णय न देण्यास बाध्य केले असा आरोप ग्राम पंचायत सरपंच व ग्राम पंचायत सदस्याचा आहे. न्यायप्रविष्ठ केश सुरु असताना संस्थेचे अध्यक्ष डॉ.अरुण मोटघरे यांनी सरकारी जागेलगत बांधकाम केले तेव्हा न्यायालयाचा अपमान होत नाही का? असा प्रश्न सरपंच व गावकरी करीत आहेत. पवनी भंडारा राज्यमार्गावर पॉवर स्टेशनसमोर स्व.लक्ष्मणराव मोटघरे चॅरिटेबल ट्रस्ट आहे. त्याचे अध्यक्ष डॉ.अरुण मोटघरे आहेत. त्यांचे पॉलीटेक्नीक, बी.एड. व इतर कॉलेज तेथे आहे. सरकारी जागेचा वापर मैदानासाठी सध्या त्यांच्याकडून सुरु आहे असे ग्राम पंचायतीचे म्हणणे आहे. सरकारी जागेचा वाद न्यायप्रविष्ट असताना दोन्ही पक्षाने तटस्थ राहणे आवश्यक होते. पण उपअधिक्षक कार्यालय, पवनी कडून न्याय न मिळाल्यास उपसंचालक भूमिअभिलेख तसेच हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न मांडणार असल् याचे ग्राम पंचायत म्हणणे आहे. यासंबंधात उपअधिक्षक टी.जी. सैय्यद यांना विचारणा केली असता सर्वेअर हटवार यांनी मोजणी पूर्ण केली. क प्रत अर्जदार ग्राम पंचायत कोसरा यांना देणे बाकी होते. मोजणी केलेल्या दोन्ही गटासंबंधात न्यायालयात प्रकरण सुरु असल्याचे डॉ.अरुण मोटघरे यांनी कार्यालयाला पत्र दिले. मोजणीची क प्रत दिल्यास कोर्टाचा अवमान होईल म्हणून सीमांकन व प्रत न दिल्याचे सांगितले. यावेळी सर्वेअर हटवार यांनी देखिल मोजणी पूर्ण झाली. फक्त सीमांकन सांगितले नाही. न्यायालयात प्रकरण सुरु असल्याने ते देता येत नसल्याचे सांगितले. पवनी भंडारा राज्यमार्गावर असलेली सरकारी जागा जवळपास एक हेक्टर पेक्षा जास्त आहे. या जागेवर अतिक्रमण होऊ नये ती अबाधित राहावी अशी भूमिका ग्रा.पं. ची आहे. पण त्यास सुरुंग लावण्याचे काम काही लोकांकडून सुरु आहे. ही कोट्यवधी रुपयाची जागा कोणी ताब्यात घेत असल्यास गावात वेळप्रसंगी तीव्र नाराजीचा सूर उमटू शकते. कोर्टाचा निर्णय लागेपर्यंत आजूबाजूच्या कोणत्याही शेतमालकांनी कच्चे किंवा पक्के बांधकाम सरू नये अशी ग्राम पंचायत पदाधिकारी यांची मागणी आहे. हे प्रकरण कसे सुटते याकडे गावकऱ् यांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)