शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांच्या संपाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 22:54 IST

केंद्र सरकारने आयुध निर्माणीतील उपक्रम, साहित्य कंत्राटदारी पद्धतीने उत्पादन करण्यास दिल्याने ६० हजार कामगार बेघर झाले. परिणामी आयुध निर्माणी संबंधित क्षेत्रीय व लघु उद्योग बंद झाले.

ठळक मुद्देआयुध निर्माणी : कामगारविरोधी धोरणाचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : केंद्र सरकारने आयुध निर्माणीतील उपक्रम, साहित्य कंत्राटदारी पद्धतीने उत्पादन करण्यास दिल्याने ६० हजार कामगार बेघर झाले. परिणामी आयुध निर्माणी संबंधित क्षेत्रीय व लघु उद्योग बंद झाले. यामुळे देशाची सुरक्षा धोक्यात आली. या धोरणाचा विरोध म्हणून बुधवारपासून तीन दिवसीय संपाला प्रारंभ करण्यात आला. यासंपात महिला कामगारही सहभागी झाल्या आहेत. केवळ चार-पाच कामगार वगळता सर्वच कामगार कामावर रूजू झाले नाही.देशाची राष्ट्रीयकृत आॅल इंडिया डिफेंस एम्लॉईज फेडरेशन, इंडियन नेशनल डिफेंस वर्कर्स फेडरेशन, भारतीय प्रतिरक्षा मजदुर संघ व डेमोक्रेटिक मजदुर युनियन भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा आयुध निर्माणीच्या प्रवेशव्दारासमोर तीन दिवसीय संप पुकारण्यात आले. यात देशांतर्गत ४१ आयुध निर्माणी, ५२ डीआरडीओ प्रयोगशाळा, एमईएस, सीओडी, आर्मी बेस वर्कशॉप, आर्मी, नेव्ही, वायुदलाच्या विविध विभागांनी प्राथमिक मागण्यांसाठी धरणे आंदोलन, उपोषण, रास्ता रोको पुकारण्यात आले होते. पण केंद्र सरकार कामगाराच्या ज्वलंत प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी रक्षा उत्पादनाचे खासगीकरण थांबविण्यात यावे, आयुध निर्माणीमधील वर्कलोड वाढविणे व एनपीए नवीन पेंशन योजना बंद करून १९७२ ची पेंशन योजना लागू करणे या मागणीसाठी २३ जानेवारीपासून संप सुरू केले आहेत. आयुध निर्माणीतील दोन हजार ७०० कामगारांपैकी चार पाच कामगार कामावर रूजू झाले. मात्र उर्वरित कामगार संपात सहभागी झाल्याचे विश्वसनीय सुत्रानुसार माहिती आहे.सकाळी संपात महिला कामगारांची शंभर टक्के उपस्थिती होती. कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, याकरिता सुरक्षा अधिकारी व ठाणेदार सुभाष बारसे ताफ्यानिशी पहाटे पाच वाजतापासून आयुध निर्माणी प्रवेशव्दारासमोर डेरादाखल उपस्थित होते.