शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

अनेक वर्षांपासून बंद असलेला युनिव्हर्सल फेरो मॅग्निज कारखाना सुरु करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 22:05 IST

अनेक वर्षांपासून बंद असलेला युनिव्हर्सल फेरो मॅग्नीज कारखाना सुरु करण्यात यावे, अन्यथा वैनगंगा नदीमध्ये जलसमाधी घेण्याचा

ठळक मुद्देउद्योगमंत्र्यांना निवेदन : कारखाना सुरू न झाल्यास वैनगंगा नदीमध्ये जलसमाधी घेण्याचा शिवसेना पदाधिकाऱ्यांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : अनेक वर्षांपासून बंद असलेला युनिव्हर्सल फेरो मॅग्नीज कारखाना सुरु करण्यात यावे, अन्यथा वैनगंगा नदीमध्ये जलसमाधी घेण्याचाइशारा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उद्योगमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.तालुक्यातील माडगी येथे युनिव्हर्सल (खंबाटा) फेरो मॅग्नीज शुद्धीकरण करणारा कारखाना गत १२ वर्षांपासून बंद पडलेला आहे. सुमारे १३०० कामगार बेरोजगार झाले आहेत. माडगी शिवारातील सुपीक जमीनी शेतकºयांना कारखान्याला दिल्या होत्या. ३०० एकरात हा कारखाना आहे. अभय योजनेंतर्गत कारखान्याला अभय देण्यात आले होते, परंतु कारखाना सुरु झाला नाही. मागील ३५ वर्षापासून हा कारखाना सुरु होता. १८ आॅगस्ट २००६ पासून हा कारखाना कायम बंद आहे. या कारखान्यावर सुमारे २०० कोटींचे वीज देयक थकित होते.यापूर्वी एनटीपीसी येथे सवलतीच्या दरात कारखान्याला वीजपुरवठा करीत होती. सवलतीच्या दरात वीजपुरवठा बंद केल्याने गुंता वाढला होता. वीज वितरण कंपनीने सवलतीच्या दरात विजपुरवठा करण्यास नकार दिला होता. कारखान्याकडे सुरवातीला ५० कोटी रुपये होते. पुढे ती रक्कम वाढून २०० कोटी रुपयापर्यंत गेली होती.दरम्यान कारखानदाराने १८ आॅगस्ट २००६ मध्ये क्लोजर करण्याचा निर्णय घेतला होता. २७८ कामगारांना क्लोजरची माहिती दिली. दरम्यान कारखाना सुरु राहावा, याकरिता शिवसेना भंडारा जिल्ह्याच्या वतीने मोठे प्रयत्न करण्यात आले होते. परंतु त्यास यश मिळाले नाही. मात्र प्रशासकीय यंत्रणेत खळबळ माजली होती.राज्य शासनाने आजारी कारखान्याकरीता अभय योजना सुरु केली. युनीव्हर्सल (खंबाटा) फेरोने सन २०१४ मध्ये अभय योजनेत समावेश करण्यात आला होता. त्यामुळे कारखान्यावरील वीज बिल निम्मा माफ करण्यात आले होते. कारखानदाराने २०० कोटी पैकी ४८ कोटी रुपये भरले होते. केवळ कारखाना सुरु करण्याच्या अटीवर अभय योजनेचा लाभ मिळेल असा करारनामा करण्यात आला होता. कारखाना सुरु करण्याकरिता तीन वर्षाची वेळ देण्यात आली.सन २०१७ मध्ये तीन वर्षे लोटले तरी कारखानदाराने कारखाना सुरु केला नाही. कराराचा येथे कारखानदाराने भंग केला आहे. कारखानदाराने कारखाना परिसरातील कोट्यवधी रुपयांचा मॅग्नीजचा साठा कमी करणे सुरु केले होते. ते आताही सुरूच आहे. कारखान्याकडे ३०० एकर सुपीक जमीन पडून आहे. कारखानदाराने कारखाना सुरु करावे, अन्यथा स्थानिक शेतकऱ्यांचे त्या जमीनी परत करावे.सदर दोन वर्षापूर्वी १ जून २०१६ ला शिवसेना भंडारा जिल्ह्याच्या वतीने युनिव्हर्सल (खंबाटा) फेरो मॅग्नीज शुद्धीकरण कारखाना सुरु करण्याकरिता भर उन्हामध्ये मोठे आंदोलन केले होते, परंतु प्लांट मालकाने कारखाना सुरु करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा पुढाकार घेतला नाही. कारखाना सुरू न झाल्यास शिवसेनेच्या वतीने वैनगंगा नदीमध्ये जलसमाधी घेण्यात येईल, असे शिवसेना तुमसर- मोहाडी विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा पंचायत समिती सदस्य शेखर कोतपल्लीवार यांनी शासनाला इशारा दिलेला आहे.यावेळी भंडारा जिल्हा शिवसेनेचे अमीत एच. मेश्राम, उपजिल्हाप्रमुख सुधाकर कारेमोरे, तालुका प्रमुख प्रकाश लसुंते, शहर प्रमुख नितीन सेलोकर, माजी तालुका प्रमुख नरेश उचिबघले, उपतालुका प्रमुख नितेश वाडीभस्मे, वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष दिनेश पांडे, वामनराव पडोळे, सुरेश राहांगडाले सह पदाधिकारी तथा शिवसैनिक उपस्थित होते.