शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

बावनथडी पुलावर बॅरिकेटिंग करून वाहतूक सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:37 IST

तुमसर : बावनथडी नदीवरील पुलाला वाहतुकीदरम्यान हादरे बसत असल्याच्या कारणावरून आंतरराज्यीय पुलावरून सर्वच प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली ...

तुमसर : बावनथडी नदीवरील पुलाला वाहतुकीदरम्यान हादरे बसत असल्याच्या कारणावरून आंतरराज्यीय पुलावरून सर्वच प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली होती. दरम्यान, पुलावरून हलके वाहनाची वाहतूक सुरू झाली असताना पुलावरून पुन्हा वाहतूक बंद करण्यात आल्याने नागरिकांत रोष आहे. परिणामी, पुलावर बॅरिकेटिंग उभारून सात फूट उंचीच्या वाहनांची वाहतूक सुरू करण्याचे निर्देश माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रफुल पटेल यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह पोलीस अधीक्षकांना दिले.

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणाऱ्या कटंगी मार्गावरील बावनथडी नदीवर १९८३ मध्ये सदर पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. ३५ वर्षांपासून पुलाची देखरेख झाली नाही, तसेच नागपूर- मनसर-सिवनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातचे बांधकाम सुरू असल्यामुळे, या मार्गावरील वाहतूक बावनथडी नदीपुलावरून वळविण्यात आली होती. परिणामी, अतिभाराचे ट्रक, तसेच मोठ्या वाहनांनी रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त अधिभाराची वाहतूक होत असल्यामुळे सदर पुलाला धोका निर्माण झाला. पुलाला वाहतुकीदरम्यान हादरे बसत असल्याने अपघात होण्याची शक्यता बळावली होती. परिणामी, जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व प्रकारच्या वाहतुकीस पूल बंद केले होते. त्यामुळे दोन किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी ५० किलोमीटरचा फेरा घालावा लागत होता. परिणामी, नातेवाईक, शेतकरी, व्यापारी, कामगारांचे जीवन प्रभावित झाले होते. बावनथडी पूल आजही साबूत आहे. केवळ त्याचे मेंटेनन्स झाले नाही. त्यामुळे पुलाखालील स्प्रिंग निकामी झाले होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग व आरटीओ विभागाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना चुकीची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यानी पुलावरील सर्व वाहतूक तडकाफडकी बंद केली होती. पुलावरून हलके वाहनाच्या वाहतुकीस परवानगी घ्यावी, अशी मागणी आमदार राजू कारेमोरे यांच्यासह रायुकाँ तालुकाध्यक्ष ठाकचंद मुंगूसमारे यांनी पालकमंत्र्यांकडे केली होती. त्यामुळे पुलावरून हलके वाहनांना वाहतुकीची परवानगी देण्यात आली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पोलीस विभागाला त्या संदर्भात कसलेही पत्र प्राप्त न झाल्याने, पोलिसांनी लॉकडाऊन लागल्यानंतर नाली खोदून पुलावरील संपूर्ण वाहतूक बंद केली. परिणामी, कोरोना काळात दोन्ही राज्यांतील नागरिक प्रभावित झाले असताना, खासदार प्रफुल पटेल कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या कामाची पाहणी व खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाची उचल करण्याबाबत आढावा बैठकीसाठी रविवारी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना, ही बाब रायुकाँ अध्यक्ष ठाकचंद मुंगूसमारे यांनी खासदार पटेल यांच्या निर्देशनास आणून देताच, त्यांनी कोरोना काळात आंतरराज्यीय मार्ग बंद न करता सात फूट उंचीचे वाहन जाईल, असे बॅरिकेटिंग उभारून हलके वाहनांची वाहतूक सुरू करण्याचे निर्देश दिल्याने आता लवकरच वाहतूक पूर्वरत होणार असल्याने, परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास घेतला.