एनएसयुआयची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन भंडारा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठ विभाग नागपूर येथे भंडारा जिल्हा समाविष्ठ आहे. भंडारा जिल्ह्याचा भौगोलिक क्षेत्रफळ बघीतल्यास जवळपास नागपुरपासून भंडारा शहराचे अंतर ६० किमी आहे. तर भंडारातील लाखांदूर तालुका नागपूर पासून १३० किमी आहे. इतके जास्त अंतर असल्यामुळे विद्यापिठातील कोणत्याही समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थी व पालकांची गैरसोय होत असते. नागपूर विद्यापिठाचे उपकेंद्र भंडारा येथे सुरु करण्यात यावे, अशी मागणी एनएसयुआय पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यामुळे जर विद्यार्थ्यांना भंडारा शहरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाचे उपकेंद्र मिळाल्यास ग्रामीण भागातील तसेच जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना सोयीचे होईल. यामुळे विद्यापिठाच्या कामांकरिता थेट विद्यापिठात न जाता सदर समस्या भंडारा शहरातच सोडविता येईल. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना होणारे शैक्षणिक, मानसिक, आर्थिक व शारिरीक त्रास कमी होईल. जिल्ह्यालगत गोंदिया जिल्हा आहे. येथील विद्यार्थ्यांना भंडारा मार्गे नागपुरला विद्यापिठाच्या कामाने जावे लागते. भंडारा येथे उपकेंद्र मिळाल्यास दोन्ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. शिष्टमंडळात काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर, एनएसयुआयच्या राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआय निरीक्षक करिश्मा ठाकुर, जिल्हाध्यक्ष भुषण टेंभुर्णे, जि.प. सदस्य प्यारेलाल वाघमारे, आशिष मंडपे, उपाध्यक्ष रोशनलाल बिट्टु, सचिव अभिषेक सिंह, सुनिल बन्सोड, मुकूंद साखरकर, पवन वंजारी, लक्ष्मण कटरे, विवेक गायधने, सागर भुरे, व्यंकटेश पाथरे, हेमंत मलेवार, अविनाश नंदेश्वर, श्याम भालेराव, नागदेवे, विपुल रायकवाड, राजश्ो तांबोरकर, शुभम वैद्य, प्रशांत पारखेडकर, प्रणय थोटे, कार्तिक कडव, संजय नागोसे, विलास उपरीकर, विजय गिऱ्हेपुंजे, तुषार भुरे, चैतन्य बागडे, निखील पत्रे, शुभम जिभकाटे, सचिन नंदनवार, लिलाधर हलमारे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
रातुम नागपूर विद्यापीठाचे उपकेंद्र भंडारा येथे सुरु करा!
By admin | Updated: July 22, 2016 00:52 IST