शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडी येथील माविमच्या इमारतीत आयसोलेशन वाॅर्ड सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:36 IST

सन २०१९-२० मध्ये मोहाडी येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या इमारतीमध्ये आयसोलेशन वाॅर्ड तयार करण्यात आला होता. त्यामुळे मोहाडी तालुक्‍यातील ...

सन २०१९-२० मध्ये मोहाडी येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या इमारतीमध्ये आयसोलेशन वाॅर्ड तयार करण्यात आला होता. त्यामुळे मोहाडी तालुक्‍यातील अनेक कोरोना रुग्णांना सोयीचे होत होते. तात्काळ उपचारासाठी येथे येणे सोयीचे होत असल्याने, सर्वसामान्यांना आधार मिळत होता. मात्र २०२१ मध्ये मोहाडी तालुक्‍यात अनेक गावात कोरोना रुग्ण वाढले असतानाही अद्याप माविम इमारतीत आयसोलेशन वाॅर्ड सुरू झाला नसल्याने, अनेक रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यांना उपचारासाठी थेट जिल्हास्तरावर अथवा नागपूरात दाखल करावे लागते. त्यामुळे रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी पुन्हा एकदा मोहाडी येथील माविमच्या इमारतीत आयसोलेशन वाॅर्ड सुरू करण्याची मागणी तालुक्यातून जोर धरत आहे. वेळेत उपचार मिळत नसल्याने अनेक रुग्णांना याआधी आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक जण भंडारा, नागपूरकडे धाव घेतात. मात्र प्रवासादरम्यानच अनेकांना आपला जीव गमवावा लागतो आहे. त्यामुळे रुग्णासह नातेवाईकांची होणारी फरफट थांबविण्यासाठी मोहाडी येथील महिला आर्थिक विकास महामंडळ प्रांगणात जास्तीत जास्त बेड व प्राणवायूसह कोरोना रुग्णांना लागणारे साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपच्या कार्यकर्त्यां योगिता तरारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.