शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कृषीवर आधारित उद्योग सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 23:30 IST

बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने भंडारा व पवनी या दोन तालुक्यात कृषीवर आधारीत उद्योग सुरू करावे, अशी मागणी माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे.

ठळक मुद्देउद्योगमंत्री सुभाष देसाई यांना नरेंद्र भोंडेकर यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने भंडारा व पवनी या दोन तालुक्यात कृषीवर आधारीत उद्योग सुरू करावे, अशी मागणी माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे. याबाबत भोंडेकर यांनी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना मुंबई येथे निवेदन दिले. याप्रसंगी शिक्षक सेनेचे प्रदेशाध्याक्ष अभ्यंकर प्रामुख्याने उपस्थित होते.पवनी शहर आणि तालुक्याचा सर्वांगिण विकास व्हावा, येथील तरूणांना रोजगार उपलब्ध व्हावा, या दृष्टीने नरेंद्र भोंडेकर यांनी ते आमदार असताना वर्ष २०१२ मध्ये पवनी तालुक्यात एमआयडीसीला मंजूरी मिळवून दिली होती. मात्र, नंतरच्या काळात येथे उद्योगांची उभारणी झाली नाही. जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकºयांच्या विकासासाठी एमआयडीसी पवनी येथे भात क्लस्टरला जागा देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी सातत्याने शासनाकडे लावून धरली आहे.भंडारा तालुक्यासाठी गडेगाव येथे एमआयडीसी असली तरी पुरेशी जागा उपलब्ध नाही. परिणामी, नवीन उद्योग उभारण्यास अडचणी येत आहेत. त्याकरिता भंडारा तालुक्यासाठी २०० एकर क्षेत्राची नवीन एमआयडीसी निर्माण करून आॅटो हबला मंजूरी प्रदान करण्यात यावी, उद्योगांची उभारणी करण्यासाठी महेंद्रा अ‍ॅन्ड महेंद्रा, अशोक लेलॅन्ड, सनफ्लॅग, बजाज, होंडा, सीएट, एमआरएफ यासारख्या कंपन्यांना निमंत्रण देण्यात यावे, आदी मागण्या माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे या भेटीदरम्यान केली. भंडारा आणि पवनी तालुक्याच्या औद्योगिक विकासासाठी राज्य सरकार प्रयत्न आणि सर्वतोपरी सहकार्य करणार असून, भात क्लस्टरला जागा दिली जाईल, एमआयडीसीकरिता अतिरिक्त जागा देऊन मोठ्या कंपन्यांनी येथे उद्योग उभारावे यादृष्टीने प्रयत्न केले जातील, असे आश्वासन उद्योग उद्योगमंत्र्यांनी यावेळी दिले.