भंडारा : मागील काही निवडणुकांचा आलेख तपासला तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारार्थ स्टार प्रचारकांनी पाठ फिरविली आहे. जिल्ह्यात सर्वच पक्षांचे नेते आपआपल्या कार्यकर्त्यांच्या बळावर प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. वक्तृत्व शैलीने सभा जिंकणाऱ्या प्रख्यात स्टार प्रचारकांची उमदेवार आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. भंडारा : राज्यात एकाचवेळी १५ आॅक्टोंबर रोजी विधानसभा निवडणूक होत आहे. प्रचाराचा ज्वर चढत असताना पक्षांकडे स्टार प्रचारकांची वाणवा दिसून आली आहे. जिल्ह्यात स्टार प्रचारकांच्या सभा अत्यल्प प्रमाणात होत असल्यामुळे कार्यकर्ते समर्थक उमेदवारांसाठी जीवाचे रान करीत आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत केवळ बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल याच स्टार प्रचारकांचे दौरे आणि प्रचारसभा झालेल्या आहेत. मागील काही निवडणुकांचा आलेख तपासला तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारार्थ स्टार प्रचारकांनी पाठ फिरविली आहे. जिल्ह्यात सर्वच पक्षांचे नेते आपआपल्या कार्यकर्त्यांच्या बळावर प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. वकतृत्व शैलीने सभा जिंकणाऱ्या प्रख्यात स्टार प्रचारकांची उमदेवार आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. सभा जिंकणारे स्टार प्रचारक आल्याशिवाय निवडणुकीला पोषक वातावरण तयार होत नाही. त्यामुळे अनेक उमेदवार पक्ष नेतृत्वाशी संपर्क साधत आहेत परंतु १५ तारीख जवळ येत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेनेचे राज्यस्तरीय नेते आपआपल्या मतदारसंघात गुंतलेले असल्यामुळे त्यांना मतदार संघाबाहेर पडणे कठीण झाले आहे. आघाडी आणि युती, संपुष्टात आल्यामुळे सर्वच पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारादरम्यान कस लागत आहे. येत्या बुधवारला निवडणूक असून उमेदवार अद्याप अर्ध्याधिक मतदारांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. ज्या पक्षाकडे कार्यकर्त्यांची फळी तयार आहे. त्याच पक्षाच्या उमेदवारांचे चिन्ह आणि नाव मतदारांपर्यंत पोहोचलेले आहे. भंडारा जिल्ह्यात तुमसर, भंडारा, साकोली असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. या तिन्ही क्षेत्रात एकूण ५३ उमेदवार रिंगणात आहेत. गावखेड्यात प्रमुख उमेदवारांची नावे वगळता मैदानात असलेल्या अन्या उमेदवारांची नावेसुध्दा माहीत नाहीत. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी प्रचारात आघाडी घेण्यासाठी स्टार प्रचारकांना सभा, रोड शो, कॉर्नर बैठकांच्या माध्यमातून मतदारापुढे आणण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही. बुधवारच्या सायंकाळी प्रचाराची रणधुमाळी थांबणार आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस सामाजिक मोर्चेबांधणीसाठी सर्वच पक्षांनी भर दिला आहे.कमी वेळात सर्वच गावात पोहोचण्यासाठी उमेदवारांची कसरत सुरू आहे. पक्षाच्या उमेदवारांचे जाळे असल्यामुळे त्यांना प्रत्येकच कार्यकर्त्यांच्या घरी जावे लागत आहे तर ज्या उमेदवारांचे नेटवर्क नाही त्यांना मात्र सर्वच ठिकाणी पोहोचावे लागत आहे. प्रभावी शैलीने जिंकणारे स्टार प्रचारक असले की प्रचाराचा फारसा ताण जाणवत नाही. परंतु यावर्षी एकाही पक्षाकडे स्टार प्रचारक फिरले नाहीत. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱ्या पक्षाकडे तर नेत्यांची कमी नसतानाही त्यांच्या प्रचारासाठी एखादा नेता वगळता कुणी आले नाही. त्यामुळे ज्यांच्या बळावर निवडणूक जिंकण्याचे स्वप्न पाहिले होते त्यांचा मात्र भ्रमनिरास झाला आहे. (प्रतिनिधी)
स्टार प्रचारकांची वाणवा
By admin | Updated: October 11, 2014 22:59 IST