शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

स्थायी समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले

By admin | Updated: January 14, 2017 00:24 IST

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षातील भिंतीवरून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवाजी महाराज यांचे छायाचित्र काढण्यात आल्याने ...

वादळी सभा : शिवरायांचे छायाचित्र, लघु पाटबंधारे विभागाच्या प्रभाराचे प्रकरण गाजलेभंडारा : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षातील भिंतीवरून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवाजी महाराज यांचे छायाचित्र काढण्यात आल्याने शिवसैनिकांनी गुरूवारला जिल्हा परिषदेत राडा घातला. हा मुद्दा शुक्रवारच्या स्थायी समितीच्या सभेत कृषी सभापती नरेश डहारे यांनी सुरूवातीला लावून धरत दोषींविरूद्ध कारवाईची मागणी केली. यासोबत लघु पाटबंधारे विभागाचा प्रभार देण्यावरून पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले, अशा एकाहून एक विषयांवर आजची स्थायी समितीची सभा चांगलीच वादळी ठरली.जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा घेण्यात आली. या सभेत समितीचे पदसिद्ध सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, कृषी सभापती नरेश डहारे, समाजकल्याण सभापती नीळकंठ टेकाम, अर्थ व बांधकाम सभापती विनायक बुरडे, महिला व बालकल्याण सभापती शुभांगी रहांगडाले, समिती सदस्य धनेंद्र तुरकर, संदीप टाले, सरिता चौरागडे, होमराज कापगते, प्यारेलाल वाघमारे, मनोहर राऊत, रमेश डोंगरे यांच्यासह सर्व विभागप्रमुख व सर्व खंडविकास अधिकारी उपस्थित होते.सभेच्या सुरूवातीला कृषी सभापती डहारे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे यांच्या कक्षातील शिवाजी महाराजांचे छायाचित्र काढल्यामुळे शिवसैनिकांनी जिल्हा परिषदेत गदारोळ केला. याला अधिकारी दोषी असल्याचा आरोप केला. शिवाजी महाराज हिंदूंचे आराध्यदैवत असून त्यांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही, असा निर्वाणीचा ईशारा सभागृहात दिला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके यांनी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. परंतु डहारे यांनी अधिकाऱ्यांची मुजोरी सहन करणार नसल्याचे खडसावून सांगितले. सभापती शुभांगी रहांगडाले यांनीही वाळके यांना चांगलेच खडेबोल सुनावले. यावर वाळके यांनी, माझी यात चुक नाही, कुणाच्या कक्षात काय चालते, हे मी बघत नाही. प्रत्येक प्रकरणात माझ्यावरच खापर फोडले जाणे, हे बरोबर नाही. मी सामान्य झालो आहे, असे उद्विग्न उद्गार वाळके यांनी काढून या प्रकरणाला बगल देण्याचा प्रयत्न केला. यावर शुभांगी रहांगडाले यांनी, सामान्य प्रशासन विभागाची जबाबदारी तुमच्याकडे असल्यामुळे हा विषय तुमच्याशी निगडीत असल्याचे सांगून वाळके यांना धारेवर धरले.(शहर प्रतिनिधी)गुप्तांकडे प्रभार देण्याचा ठरावलघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पी.एस. पराते हे रजेवर गेले आहेत. त्यांचा प्रभार उपविभागीय अभियंता आर.एच. गुप्ता यांना देण्याच्या सुचना पदाधिकाऱ्यांनी सीईओंना दिले होते. मात्र, अधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाचे अभियंता शेळके यांच्याकडे प्रभार सोपविला होता. अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांनी सभागृहात येण्यापूर्वी शेळके यांना संबंधीत विभागाच्या कामांचा अभ्यास करून या, असे खडेबोल सुनावले. मार्च महिन्यात देयकांचे कमिशन घेण्यासाठी येणाऱ्या पराते यांना परत पाठविण्याचा ठराव पारीत करावा, अशी मागणी सदस्य संदीप टाले यांनी केली. यावेळी लघु पाटबंधारे विभागाचा प्रभार उपविभागीय अभियंता आर.एच.गुप्ता यांच्याकडे देण्याचा ठराव घेण्यात आला.उपाध्यक्ष, सीईओंची अनुपस्थितीस्थायी समितीच्या सभेला जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे व मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे हे उपस्थित नव्हते. डोंगरे हे नागपूरला न्यायालयीन कामांसाठी तर अहिरे हे आयएएसच्या प्रशिक्षणासाठी गेल्याचे सांगण्यात आले. गुरूवारला शिवाजी महाराजांच्या फोटोवरून झालेल्या वादामुळे आजची सभा महत्त्वपूर्ण होती. या सभेला ते उपस्थित नसल्यामुळे चर्चेला वाव मिळाला. याशिवाय शिक्षण विभागातील महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. परंतु शिक्षण विभागाचे प्रमुख अधिकारी २.३० वाजेपर्यंत उपस्थित झाले नाही. जे उपस्थित होते त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला.