शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

तीन सभापतींच्या अनुपस्थितीत स्थायी समिती सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 23:13 IST

ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचार संहितेनंतर जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा आज घेण्यात आली.

ठळक मुद्देशौचालयाच्या निधीवर चर्चा : समाजकल्याण, महिला व बालकल्याण सभापतींची हजेरी, बुधवारी सर्वसाधारण सभा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचार संहितेनंतर जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा आज घेण्यात आली. या सभेला तीन सभापतींची गैरहजेरी होती. त्यांच्या अनुपस्थितीत पार पडलेल्या या सभेत साधकबाधक चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने शौचालयाच्या बांधकामाचा निधी यावर उपस्थित समिती सदस्यांनी अधिकाºयांना विचारणा केली.जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती राजेश डोंगरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे व बांधकाम सभापती विनायक बुरडे या तीन महत्वाच्या विभाग सभापतींची स्थायी समितीच्या सभेला अनुपस्थिती होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर या होत्या. या सभेला समाजकल्याण सभापती निलकंठ टेकाम हे पुर्णवेळ उपस्थित होते. तर महिला व बालकल्याण सभापती शुभांगी राहांगडाले यांनी सभेला शेवटीशेवटी उपस्थिती लावली.सभेला पदसिद्ध सचिव उप मुख्य कार्यकारी अधिकारी मुंजषा ठवकर, स्थायी समिती सदस्य धनेंद्र तुरकर, होमराज कागपते, सरिता चौरागडे, संदिप टाले, प्यारेलाल वाघमारे, मनोहर राऊ त, सुभाष आजबले यांच्यासह सर्व विभागप्रमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तीन सभापतीपैकी उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांची प्रकृती बरी नसल्याने ते वैद्यकीय उपचारासाठी नागपूरला गेले असल्याचे समजले. मात्र अन्य दोन सभापतींच्या अनुपस्थितीबाबत कळू शकले नाही.स्थायी समितीची सभा असल्याने अनेक अधिकाºयांना निरुत्साही होवून हजेरी लावावे लागल्याचे त्यांच्या उपस्थिती दरम्यान जाणवले. सभेदरम्यान धनेंद्र तुरकर यांनी अनेक गावामधील आठवडी बाजारात होणाºया अतिक्रमणाबाबत मुद्दा उपस्थित केला. सोबतच ज्याकडे शौचालय नव्हते अशांनी शौचालयाचे बांधकाम केले आहे. मात्र त्यांना अद्यापही बांधकामाचा निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे सर्व शौचालय लाभार्थ्यांना तातडीने निधी द्यावा अशी मागणी तुरकर यांनी केली. या सभेत अन्य काही सभासदांनीही क्षेत्रांतर्गत खोळंबलेल्या विकास कामाबाबतही यावेळी चर्चा केली. बुधवारला विशेष सर्वसाधारण सभा बोलविली असल्याने आजच्या सभेला महत्व आले होते, मात्र सभापींच्या गैरहजेरीने अनेकांनी नाराजगी व्यक्त केली.