शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

संकटावर मात करून ठाम उभे रहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 22:31 IST

जगात अशी अनेक माणसं आहेत, जी कर्तबगार आहेत पण अयशस्वी आहेत. संपूर्ण समाधानी व सुखी माणूस जगात शोधूनही सापडणार नाही.

ठळक मुद्देसंजय देशमुख यांचे प्रतिपादन : बंदिवानांना प्रशिक्षण हा अभिनव उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जगात अशी अनेक माणसं आहेत, जी कर्तबगार आहेत पण अयशस्वी आहेत. संपूर्ण समाधानी व सुखी माणूस जगात शोधूनही सापडणार नाही. अशा परिस्थितीत आपण अपराधी आहोत ही भावना मनात घर करुन न ठेवता आपण काहीतरी करु शकतो, ही जिद्द बाळगून येणाºया संकटावर मात करीत स्वत:ला घडवा. बंदिवानांना प्रशिक्षण हा अतिशय अभिनव उपक्रम असून या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपला व्यवसाय निश्चित सुरु करा. संकट येतील, त्रास होईल पण थोर पुरुषांचा आदर्श समोर ठेवून न डगमगता समाजात भक्कमपणे उभे रहा, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायधीश संजय देशमुख यांनी केले.जिल्हाधिकारी यांच्या पुढाकाराने स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा कारागृह व जिल्हा उद्योग केंद्राच्या संयुक्त विद्यमाने कैद्यांसाठी ८ ते १८ आॅगस्ट या दरम्यान विशेष व्यवसाय प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा कारागृहात करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा समारोप सोमवार रोजी झाला, त्यावेळी ते बोलत होते. या वेळी कारागृह अधिक्षक अ.म. कुमरे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आर.एस. खांडेकर, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक संदिप देवगीरकर, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक एन. वाय. सोनकुसरे, महिला व बालविकास अधिकारी आंबेडोरे, प्रशिक्षक शिरीष निर्वाण उपस्थित होते.यामध्ये अगरबती तयार करणे, मेनबत्ती तयार करणे, खडू तयार करणे, कापूर तयार करणे असे अनेक उद्योग प्रशिक्षणाचा यात समावेश होता. कैद्यांनी तयार केलेल्या वस्तु बाहेर विकल्या जातील व त्यातून त्यांना रोजगार मिळेल. या चांगल्या संधीचा फायदा घ्या व दुसºयांना शिकवा, असे मार्गदर्शनपर सूचना त्यांनी दिल्या. कारागृहातील बंदिवानांना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्याची प्रशासनाची कल्पना अभिनंदनीय असल्याचे सांगून देशमुख म्हणाले की, या प्रशिक्षणामुळे बंदिवानामधील माणूस घडविण्याचे काम केले आहे. सोबतच सुंदर पुनर्वसन या निमित्ताने होणार आहे. कारागृहात बंदिस्त बंदिवानांमध्ये सुध्दा चांगले व्यक्ती असून गुणवंत सुध्दा आहेत. या गुणवंतांना आकार देण्यासाठी हे प्रशिक्षण महत्वपूर्ण ठरणार आहे, असे ते म्हणाले. या ठिकाणाहून बाहेर पडल्यानंतर घेतलेल्या प्रशिक्षणाचा योग्य वापर करुन आपले जीवन समृध्द बनवा, असा सल्ला त्यांनी दिला.यावेळी प्रशिक्षण पूर्ण करणाºया २७ बंदिवानांचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. प्रशिक्षणार्थ्यांनी तयार केलेल्या अगरबत्तींचे प्रदर्शन या कार्यक्रमात करण्यात आले.यावेळी आर.एम. खांडेकर, रवी गिते, संदिप देवगिरकर, शिरीष निर्वाण यांची भाषणे झाली. या कार्यक्रमाचे संचालन स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक एन. वाय. सोनकुसरे यांनी केले तर आभार अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आर.एस. खांडेकर यांनी मानले. या प्रशिक्षणास कारागृहातील ५०० च्यावर कैदी उपस्थित होते. कारागृहात बंदिवानांना प्रशिक्षण देण्याचा हा पहिलाच उपक्रम असून यामुळे कौशल्य विकासातून अर्थ प्राप्ती हा उद्देश सार्थ ठरणार आहे.कारागृहात कौशल्य विकास प्रशिक्षण हा आपल्यासाठी सुखद अनुभव असून या पूर्वी असा उपक्रम राबविल्याचे ऐकले नव्हते. अगरबत्ती तयार करण्याचे प्रशिक्षण हा आपल्या आयुष्याला चांगले वळण देणारा क्षण आहे. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर या प्रशिक्षणाचा निश्चितच उपयोग होईल.-रत्नाकर नंदनवार, बंदिवानकौशल्य विकास प्रशिक्षणामुळे जीवनात चांगली संधी प्राप्त झाली आहे. स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी प्रशासनाने उपलब्ध करुन दिलेली ही संधी आपल्याला निश्चितच उपयोगी पडणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ मला उर्वरित आयुष्यात निश्चितच होईल.-वामन हटवार, बंदिवान