शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

चरण वाघमारे यांना धक्काबुक्कीनंतर तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 23:15 IST

मुख्यमंत्र्यांच्या सभेची पूर्वतयारी पाहण्याकरिता गेलेले आ.चरण वाघमारे यांना डॉ.पंकज कारेमोरे यांनी शाब्दीक वाद घालून धक्काबुक्की केली. यावेळी एका नगरसेवकालाही मारहाण केली.

ठळक मुद्देटायर जाळून निषेध : ठाण्यात भाजप कार्यकर्त्यांचा ठिय्या

आॅनलाईन लोकमततुमसर : मुख्यमंत्र्यांच्या सभेची पूर्वतयारी पाहण्याकरिता गेलेले आ.चरण वाघमारे यांना डॉ.पंकज कारेमोरे यांनी शाब्दीक वाद घालून धक्काबुक्की केली. यावेळी एका नगरसेवकालाही मारहाण केली. या घटनेचे तीव्र पडसाद तुमसरात क्षणात उमटले. त्यानंतर भाजपच्या शेकडो कार्यर्त्यांनी तुमसर पोलीस ठाण्याला घेराव घातला. बावनकर चौकात टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान घटनास्थळी डॉ.पंकज कारेमोरे यांना भाजप कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. तुमसर शहरात सध्या तणावाची स्थिती आहे.तुमसर नगरपरिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव कार्यक्रम नगरपरिषदेत बुधवारी दुपारी सुरु होता. कार्यक्रम आटोपून आ.चरण वाघमारे, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे व भाजप पदाधिकारी राजेंद्र नगरातील मैदानात मुख्यमंत्र्यांच्या सभेची पूर्वतयारी पाहण्याकरिता गेले. दरम्यान मैदानाच्या शेजारी राहणाºया डॉ.पंकज सुभाषचंद्र कारेमोरे हे तिथे आले. डॉ.कारेमोरे यांनी आ.चरण वाघमारे यांचेशी शाब्दीक वाद घालून धक्काबुक्की केली. दरम्यान नगरसेवक श्याम धुर्वे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी डॉ.कारेमोरे यांनी त्यांनाही मारहाण केली. त्यानंतर आ.वाघमारे व भाजप कार्यकर्ते तुमसर पोलीस ठाण्यात दाखल झाले. डॉ.पंकज कारेमोरे यांना तुमसर पोलिसांनी तुमसर पोलीस ठाण्यात घेऊन आले. दरम्यान भाजप कार्यकर्त्यांत रोष वाढला. ठाण्यात डॉ.कारेमोरे यांना भाजप कार्यकर्त्यांनी पुन्हा मारहाण केली.आ.चरण वाघमारे, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, उपाध्यक्ष कांचन कोडवानी, भाजपचे जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी यांच्या नेतृत्वात पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर बावनकर चौकात धरणे आंदोलन सुरु झाले. चौकात टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर घोषणाबाजी करण्यात आली. पुन्हा रात्री ८ वाजता शेकडो भाजप कार्यकर्ते तुमसर पोलीस ठाण्यात परत गेले. शेकडोंचा जमाव शहरात जत्थ्याने गोळा झाला होता. तुमसर शहरात सध्या तणावसदृष्य स्थिती असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याकरिता भंडारा तथा इतर ठिकाणाहून पोलीस कुमक बोलाविण्यात आली. डॉ.पंकज कारेमोरे हे माजी आ.सुभाषचंद्र कारेमोरे यांचे पुत्र आहेत. या प्रकरणाला राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री दि. ४ फेब्रुवारी रोजी तुमसरात सभेकरिता येत आहेत हे विशेष. घटनेनंतर आ.चरण वाघमारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली.