शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी. वाहकावर होणार फौजदारी गुन्ह्याची नोंद

By admin | Updated: May 24, 2015 01:20 IST

बसफेरी दरम्यान मार्ग तपासणी पथकाला वाहकांकडून काही आर्थिक गैरप्रकार झाल्याने दिसून आल्यास संबंधित वाहकाविरूद्ध पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा,..

भंडारा : बसफेरी दरम्यान मार्ग तपासणी पथकाला वाहकांकडून काही आर्थिक गैरप्रकार झाल्याने दिसून आल्यास संबंधित वाहकाविरूद्ध पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा आशयाचे परिपत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी, मुंबई यांनी काढले आहे.२० मे २०१५ पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबतचे आदेश परिपत्रकाद्वारे धडकले आहेत. मात्र या जाचक अशा परिपत्रकामुळे वाहक वर्गात संताप व असंतोषाची लाट उसळली आहे. राष्ट्रीय एस.टी. कामगार काँग्रेसने या वाहक विरोधी परिपत्रकाचा निषेध नोंदविला आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना संघटनेने आपल्या पत्रकात नमूद केले की, वाहकांचा प्रवासासोबत तिकीट दर, हेतुपुरस्सरपणे तिकीट न काढता प्रवास करणे, चिल्लर पैशाची देवाण घेवाण, विद्यार्थी सवलत व अन्या सवलतीच्या नावावर खोटे प्रवाशी आढळल्यास, मशीनमधून तिकीट उशीरा निघणे आदी सर्व कारणांमुळे वाद निर्माण होण्याचे प्रकार बरेचदा घडत असतात. अशा प्रत्येक प्रकरणात वाहकाला दोषी मानल्या जाते. परंतु बऱ्याचदा खोटे बनाव रचून हेतुपुरस्सररित्या वाहकाला यात गोवण्यात येते. वाहकाने सत्य परिस्थिती सांगितल्यावरही तपासणी अधिकारी सहकार्य न केल्याचा ठपका ठेवत कारवाईसाठी दबाव आणून सोयीनुसार बयान लिहून घेण्याचे प्रकार घडत आहेत. एक-दोन विना तिकीट प्रवाशांसाठी वाहकाला महामंडळाच्या सेवेतून बडतर्फ करण्याची पद्धत महामंडळात प्रचलीत आहेत. परंतु या सर्व प्रकारामुळे त्या वाहकांच्या भविष्याची व कुटूंबाची वाताहत होते. याबाबत बऱ्याचवेळा कामगार संघटनेने या अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु अधिकाऱ्यांनी कामगार संघटनेच्या वाहकांबद्दल दूषित दुराग्रह ठेवून वाहकांना महामंडळाच्या सेवेतून बडतर्फ करण्याचा सपाटा लावून मुस्कटदाबी चाललेली आहे. वाहक आधिच प्रचंड दहशतीखाली काम करीत आहे. आता त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश देणारे अन्यायकारक परिपत्र काढण्यात आले. त्यामुळे वाहक वर्गात कमालीचा रोष व संतापाचे वातावरण आहे. के काळे परिपत्रक रद्द करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा एस.टी. कामगार काँग्रेस संघटनेचे विभागीय सचिव भगिरथ धोटे यांनी दिला आहे. (नगर प्रतिनिधी)