शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी. झाडावर आदळली

By admin | Updated: August 9, 2014 00:46 IST

भरधाव वेगात असलेल्या बसचालकाचे वळण मार्गावर बसवरुन नियंत्रण सुटल्यामुळे बस झाडावर आदळली. या अपघातात १६ प्रवासी गंभीर जखमी झाले तर २५ प्रवासी किरकोळ जखमी झाले.

करडी (पालोरा) : भरधाव वेगात असलेल्या बसचालकाचे वळण मार्गावर बसवरुन नियंत्रण सुटल्यामुळे बस झाडावर आदळली. या अपघातात १६ प्रवासी गंभीर जखमी झाले तर २५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना शुक्रवार सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मोहाडी तालुक्यातील मोहगाव पुलावरील वळणावर घडली. तुमसर आगाराची बस क्रमांक एमएच-४०/ए-८६२८ ही चालक भैय्या सार्वे व वाहक अशोक ढबाले हे तुमसर ते मुंढरीसाठी ४.३० वाजता निघाली. मोहगाव (करडी) नाल्यावरील वळणावर पोहचताच बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव बस असल्याने ती झाडावर आदळली. त्यात बसचा समोरील भाग क्षतिग्रस्त झाला. ड्रायव्हरच्या बाजुला बसलेले जीवन गौरीशंकर उरकुडे (२३) या तरूणाचे दोन्ही पाय सिटमध्ये फसल्याने दोन तासाच्या प्रयत्नानंतर त्याला बाहेर काढण्यात आले. त्याचा एक पाय निकामी झाला. बसमध्ये तुमसर येथील शारदा कन्या विद्यालय, जनता विद्यालय, राष्ट्रीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा व प्रवाशी होते. जखमीमध्ये यामिनी शिंदे, लक्ष्मीकांत शेंडे, बांते, प्रणय कुंभारे, प्रियंका देव्हारे, तनुजा बन्सोड, प्रियंका नेरकर, प्रिती सेलोकर, आयुष निखाडे, चेतन मस्के, अनुप धोटे, वंदना खरवडे, स्वागत खरवडे, संस्कार खरवडे, रुक्साना शेख, प्रियंका बोंदरे, प्रल्हाद गाढवे, रत्नदिप बुराडे, दहिलाल ढेकले, रामेश्वर गोंधुळे, पुजा बांते, करिश्मा बुराडे, माहेश्वरी सोनवाने, युवराज गाढवे, श्रावणी गाढवे, वैष्णवी बांते, रेशमा खोडके, ग्रीष्मा सोनवाने, हर्षा तिजारे, करिश्मा रोटके, लोकेश्वर रोटके, योगेश शेंडे, रामा बुधे, मालती शेंडे, जीवन उरकुडे, बळीराम तराने, पौर्णिमा मस्के, शकील शेख, जश्युम शेख यांचा समावेश आहे. जखमींमध्ये कान्हळगाव, मुंढरी खुर्द, मुंढरी बुज, करडी येथील विद्यार्थी व प्रवाशांचा समावेश आहे. घटनेची माहिती होताच परिसरातील नागरिकाने घटनास्थळी धाव घेतली. ट्रक व जेसीबीच्या सहायाने प्रवाशांना बाहेर काढून करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. किरकोळ जखमींना उपचारानंतर सुटी देण्यात आली. काहींना भंडाऱ्याला हलविण्यात आले. घटनेचा तपास मोहाडी पोलीस करीत आहे. (वार्ताहर)