शहरं
Join us  
Trending Stories
1
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
6
Alka Kubal : अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
7
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
8
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
9
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
11
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
12
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
13
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
14
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
15
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
16
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
17
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
18
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
19
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
20
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या

एसटी काढते खड्ड्यातून वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 06:00 IST

जिल्ह्यातील सर्वात मोठे बसस्थानक म्हणून भंडारा बसस्थानकाची ओळख आहे. बसस्थानकाची निर्मिती झाल्यानंतर जुन्या बसस्थानक परिसरात सुरक्षेची व स्वच्छतेची काळजी घेण्यात आली नाही. बसस्थानकाच्या उत्तर पूर्व दिशेला कांजीहाऊस आहे. पश्चिम दिशेला भंडारा तुमसर हा राज्यमार्ग आहे.

ठळक मुद्देदुर्गंधीमुळे रहदारीवर परिणाम : राज्य परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष

इंद्रपाल कटकवार/संतोष जाधवर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील मुख्य बसस्थानक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. खड्डेच खड्डे, पार्किंगची अव्यवस्था, सुरक्षेचा अभाव आहे. दुर्गंधी व कचऱ्यामुळे समस्येत अजून वाढ झाली आहे. खड्ड्यातून वाट काढणाºया एसटीकडे खुद्द आगार प्रशासन लक्ष देईल काय, असा प्रश्न विचारला जात आहेत.जिल्ह्यातील सर्वात मोठे बसस्थानक म्हणून भंडारा बसस्थानकाची ओळख आहे. बसस्थानकाची निर्मिती झाल्यानंतर जुन्या बसस्थानक परिसरात सुरक्षेची व स्वच्छतेची काळजी घेण्यात आली नाही. बसस्थानकाच्या उत्तर पूर्व दिशेला कांजीहाऊस आहे. पश्चिम दिशेला भंडारा तुमसर हा राज्यमार्ग आहे. दक्षिण दिशेला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूल व जलतरण तलावाचा परिसर आहे.पूर्व दिशेला झोपडपट्टीचा परिसर आहे. नविन बसस्थानकाची निर्मिती झाल्यानंतर जुना बसस्थानकाच्या परिसरातून मोठ्या बाजारात जाण्यासाठी एक लहान आजही आहे. याच गल्लीतून मोठा बाजार परिसरातून येणारे प्रवासी आजही आवागमन करतात. मात्र या परिसरात दुर्गंधी आहे. कचरा अस्तव्यस्त फेकलेला दिसून येतो. बसस्थानक आवारालगत व्यापारी संकुलाची भव्य इमारत आहे. त्यामुळे जुन्या बसस्थानकाचा भाग खुला असला तरी दाबल्या गेला आहे. शेळ्या, कुत्रे व अन्य बेवारस जनावरे येथे फिरत असतात. बसस्थानकाच्या आवरात खुलेआम लघुशंकेसाठी करण्यासाठी वापर करण्यात येतो. त्यामुळेही दुर्गंधीत वाढ झाली आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य प्रमाणात नालीचे बांधकाम नाही. उघड्यावरच लघूशंका केली जात असल्याने प्रवाशांना तोंडावर रुमालच घेवून जावे लागते. स्वच्छता करण्यात येत असली स्थिती ‘जैसे थे’ आहे. बसस्थानक परिसराला लागून असलेल्या इमारती व अन्य दूकानांमधील कचरा कधी-कधी कचरापेटीत न घालता तो थेट जुन्या बसस्थानक परिसरात फेकला जातो. बसस्थानक परिसरातील डांबरीकरण उखडल्याने या समस्येत अजून भर पडली आहे. उखडलेली गिट्टी बसच्या चाकाखाली सापडून केव्हा प्रवाशांच्या अंगावर येईल याचा नेम नाही. गतवर्षी आगार प्रशासनाने मातीचे भरण घालून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला होता. बसस्थानकाच्या दोन्ही प्रवेशव्दारावरील रस्त्याची वर्षातून अनेकदा डागडूजी करण्यात येते. मात्र समस्या सुटता सुटत नाही. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची गरज आहे. दुसरीकडे पास व स्मार्टसाठीही लाभार्थी त्रस्त आहेत.प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावरबसस्थानकात प्रवाशांची नेहमी गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी अनेकदा 'हात की सफाई' करतात. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी येथे पोलीस चौकीची स्थापना करण्यात आली. मात्र त्यांची समस्या सोडविण्यात पोलीसांना यश नाही. येथील पोलीस चौकी नेहमीच कुलुपबंद अवस्थेत दिसून येते. बसस्थानक व आवारात अनेकदा बेवारस साहित्य तासन्तास पडून असते. मात्र त्याची साधी चौकशी केली जात नसल्याचे समजते. कधी-कधी ऐनवेळी बसफेऱ्या रद्द होतात. याची कल्पना प्रवाशांना नसते. याचा फटका अनेकदा बसत असल्याची प्रतिक्रीया ढिवरवाडा येथील ग्रामसेवक गोकुळा सानप यांनी दिली.बसस्थानक परिसरातील खड्ड्यांच्या दुरुस्तीचे अधिकार विभागीय नियंत्रक कार्यालयाला आहे. याबाबत वरिष्ठांना सांगून डागडुजीचे काम सुरु करण्यात येईल.-सारिका निमजे, बसस्थानक प्रमुख, भंडारा.