शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी. कर्मचाऱ्यांना वेतन करार द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 22:33 IST

विविध समस्यांमुळे एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांची दैनावस्था झाली आहे. तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढावले आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना निवेदन : कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेची मागणी

आॅनलाईन लोकमतभंडारा : विविध समस्यांमुळे एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांची दैनावस्था झाली आहे. तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढावले आहे. मागील दिड वर्षांपासून प्रलंबित असलेला वेतन करार सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर त्वरित देण्यात यावा, यासह प्रलंबित मागण्यांसाठी भंडारा विभागाच्या कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फेत मुख्यमंत्र्यांना व विभाग नियंत्रकामार्फेत एस.टी.चे व्यवस्थापकीय संचालकांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.एस.टी. महामंडळातील संघटनांनी दिवाळीत चार दिवसीय बेमुदत संप पुकारला होता. परंतु सरकारने न्यायालयीन कचाट्यात ओढून कर्मचाऱ्यांची पगारवाढ रेंगाळत ठेवण्याचे षडयंत्र सुरू केले आहे. महामंडळ तोट्याचे कारण पुढे करून कर्मचाऱ्यांची पगारवाढ रोखून धरत आहे. परंतु तुटपुंज्या वेतनात कर्मचाऱ्यांना जीवन जगणे असह्य झाले आहे. मागील दिड वर्षांपासून रेंगाळत असलेला वेतन वाढीचा तिढा लवकर सोडवावी, या मागणीसाठी शुक्रवारला विश्रांतीवेळात कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्यावतीने भंडारा विभागीय कार्यालयासमोर 'ढोल बजाव, शासन जगाओ' अंतर्गत निदर्शने करण्यात आली. या आंदोलनातून राज्य परिवहन कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करावा, परिवहन कर्मचाºयांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय दूर करावा, मागासवर्गीयांचे आरक्षण संपविण्याचे षडयंत्र बंद करावे, ग्रामीण भागातील लोकवाहीणी असून शिवशाही बसेस न घेता लाल बसेस खरेदी करण्यात याव्यात, खाजगी बसेस बंद करून महामंडळात सुधारणा करण्यासाठी शासनाने बजेटमध्ये तरतूद करावी, कास्ट्राईब संघटनेसोबत दर तीन महिन्यांनी घेण्यात येणारी त्रैमासिक बैठक शासनाच्या आदेशानंतरही घेण्यात येत नाही, ती नियमितपणे घेण्यात यावी, मागासवर्गीय कर्मचाºयांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देण्यात यावे, अशा अनेक न्याय मागण्यांसाठी कास्ट्राईब संघटनेच्यावतीने राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्यावतीने भंडारा विभागीय कार्यालयासमोर ढोल वाजवून शासनाला आपल्या न्याय मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.आंदोलनात कास्ट्राईब रा.प. कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष दिलीप घोडके, सचिव प्रशांत लेंडारे, कार्याध्यक्ष विजय नंदागवळी, प्रशांत भोयर, अशोक भोयर, सोहन मेश्राम, सचिन गजभिये, रवि मुल, मुकेश वाहणे, सुरेश साखरे, गौरव खापर्डे, निशांत भोयर, प्रवीण शाहू, आनंद मोटघरे, निशिकांत मोटघरे, विजय बांगर, सुरेश शेंडे, विमेश खोब्रागडे, पंकज वानखेडे, कमलेश मेश्राम, संतोष ठवकर, प्रशांत चिमणकर, सचिन महाजन, भोजराज मसराम, विपीन बोरकर, ऋषिकेश धमगाये, महेंद्र मोरे, राजु मेश्राम, मिनल शहारे, शुभांगी बोरकर, अस्मिता चवरे, लतीश नारनवरे, विपीन बोरकर, सुरेश राऊत आदी प्रामुख्याने उपस्थित होते.