शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडी बसस्थानकावर निघाले एसटीचे चाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:11 IST

तुमसरकडून राजुराकडे जाणाºया एस.टी. बसचे मागील चाक मोहाडी बसस्थानक परिसरात बाहेर निघाले. बस थांबण्याच्यावेळी हा प्रकार घडल्यामुळे सुदैवाने अनर्थ टळला.

ठळक मुद्देअनर्थ टळला : ५४ प्रवाशी होते बसमध्ये

सिराज शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : तुमसरकडून राजुराकडे जाणाºया एस.टी. बसचे मागील चाक मोहाडी बसस्थानक परिसरात बाहेर निघाले. बस थांबण्याच्यावेळी हा प्रकार घडल्यामुळे सुदैवाने अनर्थ टळला. या बसमध्ये ५४ प्रवाशी प्रवास करीत होते. ही घटना शुक्रवारला एक वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान या प्रकारामुळे घाबरलेले प्रवासी बसमधून उतरले.तुमसर ते राजुरा ही लांब पल्ल्याची बस आहे. लांब पल्ल्याच्या बसेसची काटेकोर पाहणी करूनच बस सोडण्यात येते. मात्र तुमसर आगाराच्या बस क्रमांक ८७७३ चे मागील चाक अचानक बाहेर निघणे हा निष्काळजीपणा असल्याचे बोलले जात आहे. धावत्या बसमध्ये हे चाक निघाले असते तर मोठा अनर्थ घडला असता.तुमसर ते मोहाडी हे अंतर १० कि़मी.चे आहे. ही बस २५० कि़मी. पुढे चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरापर्यंत जाणार होती. मोहाडी येथे ही बस पोहचताच मागील चाकाचे संपूर्ण नटबोल्ट खुलून खाली पडून चाक बाहेर निघाले होते. मागे दोन चाके असली तरी दोन्ही चाके एकाच नटबोल्टने कसलेले असतात. त्यामुळे दोन्ही चाके बाहेर निघण्याची शक्यता होती.ही घटना घडल्यावर आगार व्यवस्थापक नितीन उजवणे हे मोहाडीला येऊन या प्रकाराची माहित जाणून घेतली. त्यानंतर बसची तपासणी करून गंतव्य स्थानाकडे बसला रवाना करण्यात आले.संपूर्ण तपासणी केल्यावरच बस सोडण्यात येते. नटबोल्ट निघाल्याने चाक बाहेर आले. मी स्वत: तिथे जाऊन चौकशी केली व त्या बसला पुढच्या प्रवासाकरिता पाठविण्यात आले.-नितीन उजवणे, बसडेपो व्यवस्थापक, तुमसर.