शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

एसटीला बंदी, जड वाहतुकीस संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 22:34 IST

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य एसटीचे आहे. परंतु तुमसरात येणारे शेकडो विद्यार्थी, विद्यार्थीनी जड वाहतूक बंदीमुळे शहराच्या वेशीवर उतरुन किमान ८०० ते एक किमी अंतर पैदल मार्च करुन शाळेत जात आहेत. एकीकडे एसटीला बंदी तर जड वाहतूकीला संधी, असा प्रकार तुमसरात सुरु आहे.

ठळक मुद्देसावित्रींच्या लेकींचा पैदल मार्च : ८०० मीटर पायी प्रवास, शहरातून बसगाड्या नेण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य एसटीचे आहे. परंतु तुमसरात येणारे शेकडो विद्यार्थी, विद्यार्थीनी जड वाहतूक बंदीमुळे शहराच्या वेशीवर उतरुन किमान ८०० ते एक किमी अंतर पैदल मार्च करुन शाळेत जात आहेत. एकीकडे एसटीला बंदी तर जड वाहतूकीला संधी, असा प्रकार तुमसरात सुरु आहे. सकाळी शहरातूनच एसटी जाण्याची गरज आहे. शहरातून एसटी जाण्यास मनाई आदेश नाही तरी मागील अनेक महिन्यांपासून देव्हाडी मार्गावरील बसेस बायपास मार्गानेच बसस्थानकात जातात.देव्हाडी-तुमसर मार्गावरील सकाळच्या बसेस विनोबा भावे बायपास मार्गानेच बसस्थानकात जातात. त्यामुळे शहीद मंगेश बालपांडे चौकात देव्हाडी मार्गाने येणारे ग्रामीणचे शेकडो विद्यार्थी-विद्यार्थीनी येथे उतरतात. सदर चौकातून शाळा-महाविद्यालयाचे सुमारे ८०० ते एक किमी लांब अंतरावर आहेत. चिमुकल्या विद्यार्थ्यांची येथे खूपच गैरसोय होते. विद्यार्थीनींना ते कष्टदायक आहे. दुसरीकडे सकाळी जड वाहतूक शहरातून सर्रास सुरु राहते. सकाळी ८ ते ११ पर्यंत वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे तसा निर्णय घेण्यात आला होता अशी माहिती आहे. परंतु अन्य वाहने तर सर्रास शहरातून जातात.देव्हाडी, माडगी, चारगाव, ढोरवाडा, देव्हाडा तथा मोहगाव, करडी येथून शेकडो विद्यार्थी शिक्षणाकरीता तुमसर शहरात दररोज येतात. त्यांना पैदल मार्चचा फटका बसत आहे. विद्यार्थ्यांनी यापूर्वी बस शहरातून नेण्याची विनंती बस वाहकास अनेकदा केली. त्याचाही येथे नाईलाज आहे. अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये त्यांनाही नियमानुसार कामे करावी लागतात. एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी असल्याने किमान सकाळी विद्यार्थ्यांना घेवून जाणारी बस शहरातून नेण्याची गरज आहे.सकाळी देव्हाडी मार्गाकडून येणाºया बसगाड्या विनोबा भावे बायपास रस्त्याने येतांना विद्यार्थींनींनी तशी मागणी केल्यास शहरातून बसगाड्या आणण्यास काहीच हरकत नाही. याबाबत आमच्याकडे तशी लेखी मागणी कुणी केली नाही.- युधिष्ठीर रामचौरे, आगार प्रमुख तुमसर आगार.देव्हाडी मार्गाने येणाºया सर्वच बसगाडया शहरातून नेण्यात याव्यात. सकाळी शहरातून बसगाडया आणण्यात अडचण नाही. दिवसभर ला शहरातूनच जातात. इतर जड वाहतूक येथे चोवीस तास सुरु राहते. विद्यार्थ्यांना वेठीस धरता कामा नये, लेखी मागणीची वाट पाहण्याची गरजच काय? तात्काळ कारवाई न केल्यास आंदोलन करण्यात येईल.- डॉ.पंकज कारेमोरे, युवा काँग्रेस नेते तुमसर.