लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील विविध भागात असणारी महावितरणची रोहित्रे उघडीच असून या रोहित्रांवर झुडपी वेलींचा विळखा वाढला असून नागरिकांना धोका वाढला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील ऑफीसर क्लबसमोरील असणारे रोहित्र गत काही दिवसांपासून उघडे आहे.वीज वितरण कार्यालयाच्या कारभाराने नागरिक त्रस्त असून अधिकाऱ्यांचे समस्यांकडे दुर्लक्ष कायम आहे.उघड्या रोहित्रांमुळे नागरिकांच्या जीवीताला धोका निर्माण झाला असून महावितरणने मान्सूनपूर्व कामांसह विविध समस्येंसह दुर्लक्ष केले असल्याचे भंडारा शहरात दिसून येत आहे. वाढत्या वीज बिलाने आधीच ग्राहकांचे कंबरडे मोडले असून लाईटबिलाबाबतच्या तक्रारीत वाढ झाली आहे. गत आठवडाभरापासून अनेकजण महावितरणच्या कार्यालयाकडे धाव घेताना दिसत आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना भरमसाठ वीज बील भरताना अडचणींचा सामना करावा लागत आहे तर दुसरीकडे महावितरण वीज बिल भरण्यासाठी तगादा लावत आहे. कार्यालयामध्ये फोन लावूनही माहिती सांगण्यासाठी टाळाटाळ केली जाते. शहरातील विविध भागात असणारे रोहित्र उघडेच असून याकडे कर्मचाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.मात्र याकडे अद्यापही महावितरण कार्यालयाचे दुर्लक्ष होत असल्याने पावसाळ्यात धोकादायक ठरणाºया उघड्या रोहित्रांकडे वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देणार काय, असा सवाल विचारला जात आहे.लॉकडाऊन काळातील तीन महिण्यांची वीज बिले महावितरणकडून पाठविण्यात आली आहेत. भरमसाठ वीज बिले पाहताच अनेकांनी बिल भरण्यासाठी टाळाटाळ केली आहे. वीज बिल अधिक आल्याने अनेकांचे डोळे पांढरे होत आहेत.समस्या सुटता सुटेनाजिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी रोहित्राशेजारी झाडाझुडपांचा, वेलींचा विळखा वाढला असून कीटकांचा वावर वाढला आहे. अनेक ठिकाणी डिपीच्या समोरील झाकणे दिसून येत नाही. काही ठिकाणी पावसाळ्याच्या पूर्वीची कामे झालीच नसल्याचे चित्र दिसून येत आहे. सिव्हील लाईन परिसरात काही ठिकाणी लोंबकळणाऱ्या तारा तसेच झाडांच्या फांद्या तारांना स्पर्श करीत असल्याचे दिसून येत असताना समस्या सुटलेली नाही.डीपी जळाल्याने देऊळगावात शेतकरी अडचणीतजांब (लोहारा) : महावितरण कार्यालय जांब अंतर्गत देऊळगाव परिसरात आठ दिवसापासून शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पावसाने दडी मारल्याने शेतकरी आकाशाकडे डोळे लावून आहेत परंतु पाऊस येण्याची चिन्हे दिसत नाही.मोहाडी तालुक्यातील शेतकरी सुद्धा धान आणि भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. सध्या रोवणीचा हंगाम असून अनेक शेतकरी रोवणी लावण्यात व्यस्त आहेत. पाऊस नसल्याने अनेक शेतकरी बोरवेलच्या पाण्याने रोवणी करत आहेत. परंतु महावितरणच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना वेळेवर विज मिळत नाही. मागील दहा दिवसापासून देऊळगाव येथील विद्युत रोहित्र जळाले असल्याने परिसरातील वीज पुरवठा बंद आहे. एकीकडे निसर्ग शेतकºयावर कोपला आहे. तर दुसरीकडे महावितरण कंपनीचे अधिकारी शेतकºयांची तक्रार ऐकून घेण्यास तयार नाही अशा परिस्थितीत शेतकºयांनी दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला असून रोवणी खोळंबली आहे.
भंडारा शहरातील डिपींवर वेलींचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 5:00 AM
उघड्या रोहित्रांमुळे नागरिकांच्या जीवीताला धोका निर्माण झाला असून महावितरणने मान्सूनपूर्व कामांसह विविध समस्येंसह दुर्लक्ष केले असल्याचे भंडारा शहरात दिसून येत आहे. वाढत्या वीज बिलाने आधीच ग्राहकांचे कंबरडे मोडले असून लाईटबिलाबाबतच्या तक्रारीत वाढ झाली आहे. गत आठवडाभरापासून अनेकजण महावितरणच्या कार्यालयाकडे धाव घेताना दिसत आहेत.
ठळक मुद्देबिलांच्या तक्रारीत वाढ : मान्सूनपूर्व कामांकडे दुर्लक्ष