शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा संकुलाचे लोकार्पण रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 22:23 IST

खेलो इंडिया उपक्रम देशात राबविण्यात येत आहे. प्रत्येक तालुकास्थळी क्रीडा संकुलावर कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च करण्यात आला. तुमसरात क्रीडा संकुलाचे बांधकाम सहा महिन्यापूर्वी पूर्ण झाले. परंतु लोकार्पणाचा मुहूर्त अजूनपर्यंत सापडला नाही. ही प्रतीक्षा केव्हा संपणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देमुहूर्त सापडेना : साहित्य, ट्रॅक तथा इतर कामांकरिता निधीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : खेलो इंडिया उपक्रम देशात राबविण्यात येत आहे. प्रत्येक तालुकास्थळी क्रीडा संकुलावर कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च करण्यात आला. तुमसरात क्रीडा संकुलाचे बांधकाम सहा महिन्यापूर्वी पूर्ण झाले. परंतु लोकार्पणाचा मुहूर्त अजूनपर्यंत सापडला नाही. ही प्रतीक्षा केव्हा संपणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. येथील बॉक्सींग रिंग विभागीय स्पर्धेकरिता नागपूर येथे नेण्यात आली. मुलभूत साहित्य येथे अजुनपर्यंत उपलब्ध करून दिले नाही हे विशेष.खेळामुळे व्यक्तीमत्व विकास होऊन क्रीडा संस्कृती रूजावी, खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण प्राप्त व्हावे याकरिता क्रीडा संकुल बांधकामाचे नियोजन तालुकास्थळी करण्यात आले. तुमसरात नेहरू क्रीडांगणाजवळ क्रीडा संकुलाचे बांधकाम सुमारे सहा महिन्यापूर्वी पूर्ण झाले. सुमारे ९० लाख रूपये बांधकामावर खर्च करण्यात आले. सन २०१६ मध्ये प्रत्यक्ष बांधकामाला सुरूवात झाली होती. जून २०१७ मध्ये बांधकाम पूर्ण झाले.येथे मल्टीपरपज हॉलची सुविधा उपलबध आहे. ४० लक्ष क्रीडा सुविधाकरिता खर्च करण्यात आले. स्केटींग, व्हॉलीबॉलचे क्रीडांगण तयार करण्यात आले आहे.याकरिता ५० लक्ष व इतर कामांकरिता एक कोटींचा निधी येथे प्राप्त होणार आहे. येथे क्रीडा संकुलात बॉक्सींग रिंग उपलब्ध करून दिल्या होत्या, परंतु विभागीय क्रीडा स्पर्धा नागपूर येथे होत्या त्या रिंग नागपूर येथे नेण्यात आल्याची माहिती आहे. खेळाडूंना येथे मॅटची व्यवस्था नाही.मॅटची दूरावस्थेमुळे त्यात तणीस घालून खेळाडू सराव करीत असल्याचे समजते.१५ आॅगस्टला क्रीडा संकुलाचे लोकार्पण होणार होते, परंतु ते झाले नाही कां झाले नाही ते अजुनपर्यंत कळले नाही. नगरपरिषदेने ना हरकत प्रमाणपत्र दिल्यावरच क्रीडा संकुलाचे बांधकाम येथे सुरूवात झाली होती. क्रीडा संकुलाकरिता विघ्य येथे आले होते.अनेक अडथडे पार केल्यानंतर क्रीडा संकुल तयार झाले. लोकार्पण केल्यानंतर खेळाडूंना अन्य सुविधा व उर्वरित कामे लवकर निकाली निघतील त्या करिता येथे पुढाकार घेण्याची गरज आहे. आमदार चरण वाघमारे यांनी मोठी धावपळ करून क्रीडा संकुल बांधकामाकरिता निधी खेचून आणला होता हे विशेष.तुमसर येथील क्रीडा संकुलाचे बांधकाम पूर्णत्वास आल्याची माहिती संबंधित विभागाशी घेण्यात येईल. लोकार्पण केल्याने खेळाउू व क्रीडा मार्गदर्शकांना माहिती व इतर सोयी सुविधा उपलब्ध होतील.-गजेंद्र बालपांडे, तहसीलदार तुमसर.क्रीडा संकुलाचे लोकार्पण त्वरीत करून उर्वरित मुलभूत सोयी सुविधा व रखडलेली कामे संबंधित विभागाने पूर्ण करावे, खेळाला दुय्यम स्थान देता कामा नये.-डॉ. पंकज कारेमोरे, युवा काँगे्रस नेते तुमसर.