शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

गोसेवा सद्भावना पदयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 22:15 IST

गोहत्येविरोधात जनजागृती करण्यासोबतच गाईचे महत्व पटवून देत स्त्री भ्रूण हत्या आणि स्त्रियांचे महत्व या विषयांवर समाजामध्ये जागृती करण्यासाठी काढण्यात आलेली गोसेवा सद्भावना यात्रा शुक्रवार ८ जूनला भंडारा जिल्ह्यात पोहचली. लाखनी येथ ८ जूनला मुक्कामानंतर शनिवार ९ जूनला यात्रेचे भंडाऱ्यात आगमन झाले. मुस्लिम राष्ट्रीय मंच, गोसेवा प्रकोष्ठचे राष्ट्रीय संयोजक मोहम्मद फैज खान हे या यात्रेचे नेतृत्व करीत असून संपूर्ण प्रवास पायी चालून केला जाते आहे, हे विशेष.

ठळक मुद्देगोहत्येविरोधात जनजागृती : १२ हजार किलोमिटरचा टप्पा पायदळ गाठणार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोहत्येविरोधात जनजागृती करण्यासोबतच गाईचे महत्व पटवून देत स्त्री भ्रूण हत्या आणि स्त्रियांचे महत्व या विषयांवर समाजामध्ये जागृती करण्यासाठी काढण्यात आलेली गोसेवा सद्भावना यात्रा शुक्रवार ८ जूनला भंडारा जिल्ह्यात पोहचली. लाखनी येथ ८ जूनला मुक्कामानंतर शनिवार ९ जूनला यात्रेचे भंडाऱ्यात आगमन झाले. मुस्लिम राष्ट्रीय मंच, गोसेवा प्रकोष्ठचे राष्ट्रीय संयोजक मोहम्मद फैज खान हे या यात्रेचे नेतृत्व करीत असून संपूर्ण प्रवास पायी चालून केला जाते आहे, हे विशेष.जवळपास वर्षभरापूर्वी म्हणजेच २४ जून २०१७ रोजी लेह येथून गोसेवा सद्भावना यात्रेला सुरुवात झाली. लेह, कन्याकुमारी, अमृतसर असा प्रवास या यात्रेच्या माध्यमातून केला जाणार असून तब्बल १२ हजार किलोमिटरचा टप्पा गाठला जाणार आहे. दोन वर्षे कालावधीची ही यात्रा सध्या पहिल्या टप्प्यात असून यात्रेचे नेतृत्व करीत असलेले मुस्लिम राष्ट्रीय मंच, गोसेवा प्रकोष्ठचे राष्ट्रीय संयोजक महोम्मद फैज खान संपूर्ण प्रवास पायी करीत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी आहेत. भारतीय देशी गोवंशाची सेवा, संरक्षण आणि संवर्धन, देशी गाईवर आधारित कृषी प्रोत्साहन, गाईच्या नावाने समाजात वाढणारे वैमनस्य दूर करण्यासाठी सद्भावना प्रस्थापित करणे, गोहत्येवर पूर्ण प्रतिबंधासाठी केंद्रात कायदा बनविण्यासाठी लोकप्रतिनिधींना प्रोत्साहित करण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे. ८ जून रोजी या यात्रेचे आगमन लाखनी येथे झाले. स्वामी विवेकानंद वाचनालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगर संघचालक उमराव बावनकुळे, नगराध्यक्ष ज्योती निखाडे, उपाध्यक्ष माया निंबेकर, डॉ.राजहंस, नगरसेवक महेश आकरे, विक्रम रोडे, देवराव चाचरे, संदीप भांडारकर, फैजल आकबानी, प्रभूदास खंडाईत, पंकज भिवगडे उपस्थित होते. लाखनी येथील मुक्कामानंतर शनिवारी दुपारी १२ वाजता सद्भावना यात्रा भंडाºयात पोहचली. येथील जिल्हाधिकारी कार्यालय चौकात खान यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सुनिल मेंढे, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत उपाध्यक्ष संजय एकापुरे, नगर परिषद उपाध्यक्ष आशू गोंडाणे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष चैतन्य उमाळकर, नगरसेवक कैलाश तांडेकर, मंगेश वंजारी, मयूर बिसेन, बजरंग दल जिल्हा संयोजक दीपक कुंभरे, मनीष बिछवे, प्रवीण उदापुरे, दिनकर गिरडकर, शैलेंद्र श्रीवास्तव यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.