शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यासाठी कोट्यवधी खर्च केले; पण प्रवास करतो तरी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2021 05:00 IST

शिवालय कंपनीच्या माध्यमातून लाखनी, सोमलवाडा, रेंगेपार, चंद्रपूर, कोका अभयारण्य आणि पुढे खापामार्गे रामटेक असा हा रस्ता तयार करण्यात आला. शासनाचे कोट्यवधी रुपये या रस्त्यासाठी खर्च झाले. हा रस्ता तयार करण्यापूर्वी पेट्रोल, पैसा व वेळ वाचेल असा प्रचार प्रसार केला होता. या रस्त्यात शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. वडसा, ब्रह्मपुरी, लाखनी, लाखांदूर,  पवनी येथून येणाऱ्यांना  कमी वेळात कमी खर्चात सुरक्षित खापा, रामटेकमार्गे पुढे जाता येईल, असे खोटे स्वप्न दाखविण्यात आले.

चंदन मोटघरेलाेकमत न्यूज नेटवर्कलाखनी : लाखनी - रेंगेपार - चंद्रपूर रस्ता बांधकामासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, चिखलाबोडीच्या पुढे रस्ता बांधकाम रखडल्याने अनेक प्रवासांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याने सुरक्षित प्रवास जर होऊ शकत नसेल तर हा रस्ता कोणत्या उपयोगाचा, असा प्रश्न आता जनतेकडून विचारला जाऊ लागला आहे. शिवालय कंपनीच्या माध्यमातून लाखनी, सोमलवाडा, रेंगेपार, चंद्रपूर, कोका अभयारण्य आणि पुढे खापामार्गे रामटेक असा हा रस्ता तयार करण्यात आला. शासनाचे कोट्यवधी रुपये या रस्त्यासाठी खर्च झाले. हा रस्ता तयार करण्यापूर्वी पेट्रोल, पैसा व वेळ वाचेल असा प्रचार प्रसार केला होता. या रस्त्यात शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. वडसा, ब्रह्मपुरी, लाखनी, लाखांदूर,  पवनी येथून येणाऱ्यांना  कमी वेळात कमी खर्चात सुरक्षित खापा, रामटेकमार्गे पुढे जाता येईल, असे खोटे स्वप्न दाखविण्यात आले. यात कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला.  अनेक दिवस या रस्त्याचे काम चालले. जेव्हा काम सुरू होते तेव्हा या रस्त्यावरील गावातील लोकांनी किती यातना भोगल्या त्यांचे त्यांनाच माहीत. ते  त्यांनी सहन केले. मात्र, या रस्त्यावर कोट्यवधी खर्च करून साध्य काय झाले,  याचे उत्तर कुणाजवळही नाही.  शासनाचे रुपये खर्च झाले, कंपनीची मात्र चांदी झाली. लाखनीवरून पुढे गेल्यावर चिखलाबोडी ते चंद्रपूर केवळ एक किलोमीटर रस्ता तसाच ठेवून शिवालय कंपनी कुठे गेली माहीत नाही. एवढा हा रस्ता असा का ठेवला, त्याचे उत्तरही मिळत नाही.  लाखनीमार्गे जवळचा रस्ता म्हणून प्रवासी या मार्गाने  निघतात. चिखलाबोडी गावाच्या पुढे जातात आणि त्यांना दिसतो चिखल मातीचा भयानक रस्ता. इतक्या दूर गेल्यानंतर पुन्हा त्यांना लाखनीला परत यावे लागते.  त्यांना जो मनस्ताप सहन करावा लागतो. दररोज दहा ते बारा चार चाकी तिथून परत जात आहेत. इतका लांबचा प्रवास करून चिखलाबडी ते चंद्रपूर केवळ एक किलोमीटर; परंतु एवढाच रस्ता भयानक आहे.   चंद्रपूरच्या अगदी जवळ  जाऊन परत यावे लागते म्हणून तक्रारी केल्या. सर्व तक्रारी दुर्लक्षित झाल्या.  आजही लोकांची फजिती होतच आहे. चार चाकी गाड्या चिखलात फसत आहेत. जवळपासच्या गावातील ट्रॅक्टर नेऊन गाड्या ओढून काढाव्या लागत आहेत.चार चाकी वाहन चालकांनी या रस्त्याने अभयारण्य कोकामार्गे जाऊ नये, असा बोर्ड तरी निदान शासनाने लावावा, जेणेकरून लोकांची फजिती होणार नाही, अशी मागणी आता जनतेकडून होत आहे. याकडे कंपनीने लक्ष देण्याची गरज आहे.

 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक